
नांदेड- जयकुमार अडकीने
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे क्रीडा महोत्सव २०२५-२६ चे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने बाहेरील जिल्ह्यातून विद्यापीठातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने मुलांचे व मुलींचे विद्यापीठ वस्तीगृह रिकामी करण्याचा निजामी आदेश जारी केला आहे. मात्र सदर निर्णयामुळे सध्या वसतिगृहामध्ये मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अभ्यास परीक्षांचे वेळापत्रक,संशोधन कार्य तसेच इतर शैक्षणिक बांधील की यावर गंभीर परिणाम होत आहे. अनेक विद्यार्थी दूरवरच्या ग्रामीण भागातून राहण्याची कोणतीही पर्यायी सोय उपलब्ध नसल्यामुळे त्रस्त होत आहेत.
क्रीडा महोत्सवासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची पर्यायी निवास व्यवस्था विद्यापीठ प्रशासनाने अन्यत्र करावी.
वस्तीग्रह खाली करण्यासंबंधी जारी केलेला आदेश तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी एसएफ आय जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कउडकर यांनी विदयापीठ प्रशासनाकडे केली आहे.

