
युवासेनेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे मागणी
नायगाव तालुक्यात मुसळधार पाऊस व ढगफुटी दृश्य पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आल्यामुळे नायगाव तालुक्यातील बरबडा पाटोदा टाकळी वजीरगाव मनुर (तंब) अंतरगाव कुंटूर कोकलेगाव परडवाडी सातेगाव सांगवी धनज मेळगाव हुस्सा राहेर या भागातील शेती पूर्ण जलमय झाली असून या शेतीत पाणीच पाणी झाले आहे त्यचे कारण बॅक वॉटर असल्यामुळे सर्व शेतातील पीक हे पाण्याखाली गेले आहे त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला असून वरील गावातील शेतकऱ्याचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून शेतकऱ्यांना जगण्यासाठी धीर द्यावा अशी मागणी गगेश पाटील सर्जे मनुरकर युवा सेना उपतालुकाप्रमुख नायगाव यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे. शेतकरी जगण्यासाठी शासनाने नायगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यात ही मदत जमा करण्यात यावी कारण आसमानी संकट हे शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो त्यांच्यावर येऊन ठेपले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ एक बैठक घेऊन दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई जमा करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे नायगाव उपतालुका प्रमुख गगेश पाटील सर्जे मनुरकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे दिलेल्या त्यांची स्वाक्षरी आहे

