
नायगाव
धुप्पा गावातील महादेव मंदिरापासून गगनबीड महादेव मंदिरापर्यंत निघालेल्या पायी दिंडी यात्रेला “हर हर महादेव”च्या गजरात धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी वातावरण लाभले.
या यात्रेत रामतीर्थ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक (API) विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार बेळिकर आणि सहकाऱ्यांनी खैरगाव हद्दपर्यंत दिंडीसोबत राहून सुरक्षेसाठी महत्त्वाचे सहकार्य केले. यात्त्र मार्गात भेट देऊन शुभेच्छा दिल्याबद्दल लोकप्रिय आदरणीय पुनमताई राजेशजी पवार यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
यात्रेकरूंना मार्गभर फराळ, पाणी, चहा, फळे यांची मनापासून सेवा करणाऱ्यांचे योगदान लक्षणीय ठरले. या सेवेमध्ये खालील ग्रामस्थांचा सहभाग होता – महादेव मंदिर, धुप्पा – लक्ष्मण पाटील बार्हाळे : केळी व पाणी बाटली वाटपमहादेव मंदिर, किनाळा – गजानन शावकार (शंकरनगर) : केळी वाटप महादेव मंदिर, किनाळा – अरविंद शावकार : पाणी बाटली वाटप,टाकळिकर पेट्रोल पंप – सचिन पाटील टाकळिकर : केळी व साबुदाणा पापडी वाटप बालाजी मंदिर, नरसी – मंदिर समिती : साबुदाणा पापडी व केळी वाटप खैरगाव – कुमूद पटेल : साबुदाणा, केळी, सफरचंद, चहा वाटप नायगाव – देविदास पाटील बोमणाळे (मा. नगरसेवक) : केळी व चहा वाटप कुसुम मंगल कार्यालय पेट्रोल पंप – जांभळे मॅडम : केळी वाटप पळसगाव फाटा – रंजित पाटील (सरपंच ताकबीड) : नायलॉन साबुदाणा व केळी वाटप गगनबीड फाटा पेट्रोल पंप – चंद्रकांत शावकार बच्चेवार : केळी वाटप,या सेवाभावी योगदानामुळे पायी दिंडीचा प्रवास अधिक आनंददायी, ऊर्जादायी आणि सुरक्षित झाला.

