
कुंटूर : अनिल कांबळे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोजे डोंगरगाव ते सुजलेगाव परिसरामध्ये 16/7/2025 रात्रीच्या व पहाटेच्या. 4, वा सुमारास बिलोली तालुक्यातील काही चोरांनी शेळ्या चोरल्या . डोंगरगाव येथील घराच्या अंगणात बांधलेल्या शेळ्या चोरून नेत होते त्यातच सुजलेगाव शिवारातील एक शेळी चोरून येताना डोंगरगाव सुजेलगाव येथील नागरिकांनी पकडून त्यांना चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.दिनांक 16 /7/ 25 रोजी सायंकाळी सहा वाजता ते दिनांक 17 /7 /25 रोजी चे पहाटे चार वाजता चे सुमारास फिर्यादीचे अंगणवाडी समोरील रिकाम्या प्लॉटमध्ये बांधलेल्या पाच शेळ्या किमती 58000/-हजार रुपयाच्या व शेळगाव छ. येथील एक शेळी किंमत 20 हजार रुपयाची असे एकूण 78 हजार रुपयाचे शेळ्या चोरणाऱ्या १) शेख अशपाक शेख बाबा वय 21 वर्षे व्यवसाय मजुरी राहणार देशमुख गल्ली ता. बिलोली २)सय्यद अलीम पिता इस्माईल वय अंदाजे 21 वर्षे व्यवसाय मजुरी राहणार बिलोली ३)समीर पिता अब्दुल नबी राहणार राहेर . ४)शेख इरफान पिता बाबू राहणार बिलोली यांनी शेळ्या चोरून नेऊन बासवाडा येथील बाजारात विक्री करीत असताना मिळून आले . फिर्यादी बालाजी गंगाधर सूर्यकांत राहणार सुजलेगाव यांनी फिर्याद दिल्यावरून कुंटूर पोलीस स्टेशन येथे ,कलम 303, 3(5) बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनी विशाल भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनात पो.हे . कंधारे हे करीत आहेत.

