
नायगाव : बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यात सुरू असलेल्या खरीप हंगामात यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक विषाणू (Yellow Mosaic Virus) व सेंद्रिय पोषण तुटवडा यांचे लक्षणीय परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे.
नायगाव व परिसरातील सोयाबीन शेती मध्ये डोकावून पहिले तर स्पष्टपणे दिसत आहे की, काही भागांतील सोयाबीन झाडांची पाने पिवळी पडली असून त्यावर ठिपके व अर्धवट वाळलेल्या अवस्थेत आहेत. ही लक्षणे मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचे संकेत देतात. यामुळे वनस्पतीची अन्न तयार करण्याची (photosynthesis) क्षमता कमी होते आणि शेवटी उत्पादनात घट होते.
संभाव्य कारणे :
1. पिवळा मोझॅक विषाणू – पांढी माशी किंवा इतर रसशोषक कीटकांमार्फत पसरणारा हा विषाणू पाने पिवळी करून उत्पादनात मोठी घट करतो.
2. मायक्रोन्युट्रिएंट कमतरता – विशेषतः झिंक, मॅग्नेशियम वा सल्फरची कमतरता असताना अशी पाने पिवळी पडतात.
3. जमिनीतील ओलावा ताण – जास्त पाऊस किंवा सतत आर्द्रता नसल्यासही अशी लक्षणे दिसू शकतात. चौकट उत्पादनात ३०% ते ५०% पर्यंत घट होण्याची शक्यता कीटकनाशक आणि खते वापरण्यावर शेतकरी यांचा खर्च वाढतो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया:
मांजरम येथील शेतकरी केशव शिंदे,विश्वनाथ शिंदे,कोलंबी येथील बालाजी परिहार म्हणाले,
“पेरणी केल्यावर सुरुवातीला झाडे चांगली वाढत होती. पण गेल्या १०–१५ दिवसांत काही झाडे पिवळी पडली. कृषी विभागाकडून मदत मिळावी, अशी आमची मागणी आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन:
तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पांढऱ्या माशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% SL किंवा थायोमेथोक्झाम २५% WG कीटकनाशकाचा फवारणीचा सल्ला देण्यात आला आहे.जमिनीची तपासणी करून झिंक किंवा सल्फरची मात्रा वाढवावी.रोगट झाडे उपटून नष्ट करावीत.वेळेवर कीटकनाशक फवारणी करावी.
खत व्यवस्थापन शास्त्रशुद्ध करावे.संशयित क्षेत्राची तपासणी कृषी सहायक किंवा अधिकाऱ्यांकडून करून घ्यावी.

