ताज्या बातम्यानांदेडनायगाव

वाढदिवस फक्त उत्सव न राहता सामाजिक कार्यातून साजरा व्हावा” ; आमदार प्रतापराव चिखलीकर.

नायगावमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार प्रतापराव चिखलीकर व प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामाजिक उपक्रम; हजारोंचा सहभाग.

  नायगाव : बाळासाहेब पांडे

“राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा आणि माझा वाढदिवस फक्त उत्सव न राहता सामाजिक कार्याच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प म्हणजे समाजासाठी उपयुक्त ठरणारा सामाजिक सोहळा आहे. रक्तदान,आरोग्य शिबिर,ही समाज मनाचा ठाव घेणारी तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारी चित्रकला स्पर्धा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी शाडू मातीपासून गणपती बनवण्याची स्पर्धा हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.” असे उदगार

आमदार प्रताप पाटील चिखलीकर, अध्यक्षस्थानावरून भाषण करताना काढले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्या पुढाकाराने ८ ऑगस्ट रोजी नायगाव येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. स्व. डी. बी. पाटील स्मृतिस्थळ व मिलेनियम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नायगाव येथे हा सोहळा पार पडला.

सामाजिक उपक्रमांची मेजवानी. ;  या विशेष दिनी नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी —आरोग्य शिबिर ; रक्तदान शिबिर,नेत्र तपासणी शिबिर,त्वचारोग शिबिर वृक्षारोपण,तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा,शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कला स्पर्धा घेण्यात आल्या उद्घाटन सोहळेरक्तदान शिबिर – माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे

चित्रकला स्पर्धा – माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा

आरोग्य शिबिर – माजी आमदार अविनाश घाटे,गणेशमूर्ती स्पर्धा – व्यंकटराव पाटील गोजेगावकर

वृक्षारोपण – प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले

सहभागाची आकडेवारी ; रक्तदान – २६१ दाते,आरोग्य शिबिर – २,००० नागरिक ; नेत्र तपासणी – १,५० नागरिक त्वचारोग शिबिर – १,०० नागरिक ; चित्रकला स्पर्धा – २,००० विद्यार्थीगणेशमूर्ती स्पर्धा – १,००० विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

मान्यवरांची उपस्थिती प्रवीण पाटील चिखलीकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, दिलीपराव धर्माधिकारी, माधव पावडे, वैशालीताई स्वप्निल चव्हाण, वसंत सुगावे, डॉ. विक्रम देशमुख, सुनंदाताई जोगदंड, नेताजी भोसले, अॅड. सोनकांबळे, पाटीलताई, शिवराज गाडीवान, उमाकांत देशपांडे, भगवान पाटील लंगडापुरे, तसेच शहराध्यक्ष नायगाव, धर्माबाद-उमरी तालुका अध्यक्ष व पदाधिकारी आदींसह अनेक नेते, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.या वेळी सचिन पाटील कल्याण यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

प्रास्ताविकातून आयोजकांची भावना ;शिवराज पाटील होटाळकर म्हणाले  “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सर्व घटकांचे व समाजाचे एकत्रीकरण. मला मिळालेले जिल्हाध्यक्ष पद म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची नेत्यांनी केलेली कदर होय. पंचकलमी कार्यक्रम राबवून जिल्ह्यात पक्षवाढीसाठी अविरत प्रयत्न करणार.” वेंकट पाटील गोजेगावकर, दिलीप धर्माधिकारी, वसंत सुगावे यांनीही मनोगत व्यक्त केले.संचलन आनंद पवार व वेंकट दुगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष प्रा. जीवन चव्हाण यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!