
माहुर : जयकुमार अडकिने
माहूर:- नारळी पौर्णिमा निमित्त परिक्रमा यात्रा काळात माहूर येथे आज सोमवारी दुसऱ्या दिवशी लाखो भाविक शहरातील मठ मंदीर व शहरा बाहेरून जात असल्याने परीक्रमा मार्गावरील दत्त चौक टी पॉइंट जवळ माहूर चे नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी यांच्या कडून (महाप्रसाद) ५ क्विंटल खिचडी चे वाटप करण्यात आले.
अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते,
धर्मादायासाठी दान केलेल्या कोणत्याही वस्तू, त्या नेहमी सर्वोत्तम दर्जाच्या किंवा स्वतः वापरता त्यासारख्याच असाव्यात कमी दर्जाच्या वस्तू दान करू नयेत या उक्तीला साजेसे असे अडीच क्विंटल तांदळा चे मसाले भात महाप्रसाद म्हणून नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी टी पॉइंट येथील नगर पंचायतीच्या नियंत्रण कक्षात वाटप केले .या महाप्रसादाचा लाभ माहूर गडावर आलेल्या हजारो भाविकांनी घेतला.नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे नेहमीच यात्रा उत्सव व कुठल्याही धार्मिक सामाजिक कार्यकात हिरीरीने सहभाग घेत असतात.तब्बल २६ किमी ची प्रदक्षिणा घालून थकलेल्या भाविकांनी रुचकर मसाले भात चा मनमुराद आनंद घेतल्याने दोन ते तीन तासातच अडीच क्विंटल च्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका ध्यक्ष मेघराज जाधव उपनगराध्यक्ष नाना लाड,अमित येवतीकर,नगर सेवक प्रतिनिधी रफीक सौदागर,आकाश कांबळे,राज ठाकूर,जगदीश वडसकर,विजय शिंदे, गणेश जाधव,जावेद दोसानी,सैफ दोसानी,संदीप गज्जलवाड,देविदास जोंधळे,विशाल मारेवाड,पत्रकार जयकुमार अडकीने, अनिल माडपेलीवर, गणेश खडसे, रफिक भाई गाईड, सदान्नड पुरी यांची उपस्थिती होती.

