
माहुर : जयकुमार अडकिने
माहूर – माहूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाई बाजार येथे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी हे दिनांक 16 जुलै 2025 रोजी नजीकच्या महागाव तालुक्यातील हिवरा येतील हॉटेल वीरा येथे चक्क कर्तव्यास दांडी मारून जुगार खेळत असल्याची बाब यवतमाळ एलसीबीच्या पथकाने टाकलेल्या धाडीत उघड झाली असून पोलिसांनी वाई बाजार ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी सह माहूर शहरातील इतर काही जणांविरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये महागाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केले. एकीकडे ग्रामविकास अधिकारी मिळेना म्हणून विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिक त्रस्त असताना वाई बाजार ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद न्यानोबा देव कांबळे हे कर्तव्यास दांडी मारून एकीकडे नागरिकांना सेवा मिळण्या पासून वंचित ठेवून दुसरीकडे गैर कायदेशीर कृत्य केल्याने सदर ग्रामविकास अधिकाऱ्याची चौकशी करून त्याचे विरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन माहूर येथील सामाजिक कार्यकर्ते भीम महोत्सव या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आकाश कांबळे यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना सदर ग्राम विकास अधिकाऱ्याविरुद्ध महागाव पोलीस ठाणे जिल्हा यवतमाळ येथे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रथम खबरी अहवालाच्या व विविध वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्ताच्या कात्रण प्रतीसह सादर केले आहे. याबाबत संपूर्ण तालुका भर चर्चा होत असून, कर्तव्यास दांडी मारून जुगार खेळणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याविरुद्ध बडतर्फीची कारवाई होणार काय! याकडे संपूर्ण माहूर तालुक्याचे लक्ष लागले आहे!

