ताज्या बातम्यानांदेडनायगाव

अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती कोलंबी येथे 24 रोजी साजरी होणार

 

नायगाव : बाळासाहेब पांडे

साहित्यरत्न, साहित्यशिरोमणी डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती सोहळा कोलंबी (ता. नायगाव) येथे रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. वंचित, शोषित आणि पीडित समाजाच्या हक्कासाठी लेखणी व तलवारीच्या बळावर संघर्ष करणारे डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता होणार असून श्री महंत युवराज गिरी गंगेश्वर महाराज यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात येईल. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मा. श्री शिवराज प. होटा ल कर (जि.प. शिक्षण सभापती) भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा. नागरबाई शिवाजीराव. शिदे कोलंबी,यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे . प्रमुख अतिथी म्हणून सत्कार मूर्ती म्हणून खा.रवींद्र चव्हाण,नागिणी ताई कांबळे, पंकज भाऊ गायकवाड,

मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

या जयंती सोहळ्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री मा. डॉ.भगवान वाघमारे सर (साहित्यिक व सामाजिक चिंतक, उस्मानाबाद), श्री मा. करणे सर (साहित्यिक व विचारवंत), तसेच श्री पी. बी. वाघमारे (महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार पुणे) उपस्थित राहून विचार मांडणार आहेत.

यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.कार्यक्रमासाठी नियोजनामध्ये जयंती मंडळ कार्यकारी मंडळ ,या सह समाजबंधूंचा मोठ्या संख्येने सहभाग आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!