
कुंटूर प्रतिनिधी :- सिद्धार्थ गजभारे
नायगाव तालुक्यातील कूंटूर पोलीस ठाणे येथे गेल्या दीड वर्षापासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांच्या कार्यकाळात अवैधधंद्यांना उत आला असल्याने आता कुंटूर ठाण्याचा नुकताच पदभार स्वीकारलेले सहायक पोलिस निरीक्षक विशाल भोसले साहेब यांच्यापुढे अवैधरीत्या चालू असलेल्या धंद्यांना आळा घालण्याचे आवाहन उभे टाकले असून नव्यानेच रुजू झालेले सपोनी. विशालभोसले हे कूंटूर परिसरातील अवैधधांद्याना आळा घालतील अशी अपेक्षा जनसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. तत्कालीन सपोनी रामकृष्ण पाटील यांनी कूंटूर ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात, अवैधरित्या देशी,विदेशी दारू विक्री तसेच वृक्षतोड, अवैधरित्या रेती व मातीचे उत्खनन अश्या अनेक धंद्यांना पाठबळ मिळाले असल्याने परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला असून त्यांच्या कार्यकाळात शेळ्या मेंढ्यासह अनेक गावात घरफोडीच्या मोठमोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत, मोरईकळी येथे नुकतीच घराचे कुलूप फोडून दहा तोळे सोने चांदीचे दागिने व नगदि दिड लाख असा एकूण चौदा लाखाचा ऐवज चोरट्याने लंपास केला सदर प्रकरणासह एकाही चोरीचा तपास रामकृष्ण पाटील यांच्या कार्यकाळात झाला नसल्यानेच त्यांची येथून उचल बांगडी झाल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे.
कुंटूर येथील बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी गोमातेची कत्तल व गोमासाची विक्री करणाऱ्या व्यक्ती च्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केल्याने तत्कालीन सपोनी रामकृष्ण पाटील यांनी तक्रार न घेताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अर्वाच भाषा वापरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असल्याच्या चर्चेला उधाण आले असले तरी तत्कालीन सपोनी पाटील यांच्या कार्यप्रणालीवर जनता मात्र त्रस्त झाली होती.मात्र आता सपोनी पाटील यांची बदली झाली असल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात असल्याची विविध ठिकाणी ऐकावयास मिळत आहे.

