Uncategorized

राष्ट्रीय महामार्गावर वाई बाजार येथे अपघात  ; मोटरसायकलची ट्रकला मागून धडक दोन जागेवर ठार एक गंभीर. ; वाई बाजार येथील वाघाई टेकडी जवळ रस्त्यावरील घटना.

श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने

माहूर तालुक्यातुन गेलेल्या धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गावरील वाई बाजार जवळील वाघाइ टेकडी जवळ असलेल्या रस्त्यावर उभ्या ट्रकला मोटरसायकलची मागून जोरदार धडक बसल्याने मोटरसायकल वरील तिघांपैकी दोन जण जागेवरच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि 23 रोजी 4 वाजता घडली आहे

वाघाई टेकडी जवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बीकेसी कंपनीच्या ट्रक क्रमांक AP39,ux,6876 मोटर सायकल क्रमांक.m h 26,f 4238 ची जोरदार धडक बसली मोटरसायकल वर बसलेले असोली साईनगर येथील तरुण विट्ठल राठोड वय ३० वर्ष आणि अर्जुन विठ्ठल राठोड वय 10 वर्ष सोबत एक आंध्रप्रदेशातील वयोवृद्ध अंदाजे ६५ वर्ष हे तिघे आसोली ते लसनवाडी येथे जात असताना वाघाई टेकडी जवळअचानकपणे मोटरसायकल ट्रकवर मागून जाऊन आदळली झालेल्या धडकेत दोघांच्या डोक्यात तोंडाला छातीला मार लागल्याने दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर दहा वर्षीय अर्जुन गंभीर जखमी झाला

घटना कळताच सिंदखेडचे सपोनी रमेश जाधवर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयता सह जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले येथे डॉ मंगेश नागरगोजे यांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित करून जखमी अर्जुन वर उपचार सुरू आहेत अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!