ताज्या बातम्यानांदेड

स्थानिक.स्व.संस्थाच्या सर्व जागा माकप लढणार – कॉ. शंकर सिडाम (जिल्हा सचिव,माकपा).

माहूर: दिनांक 23 जुलै रोजी माकपा जिल्हा समितीची बैठक राज्य सचिव मंडळ सभासद तथा जिल्हा प्रभारी एम.एच शेख,जेष्ठ नेते कॉ. विजय गाभाने, शेतकरी नेते कॉ. अर्जुन आडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार नेत्या उज्वला पडलवार यांच्या अध्यक्षेतेखाली माहूर विश्रामग्रह येथे संपन्न झाली.

बैठकीत राज्य सरकाने पारीत केलेल्या जन सूरक्षा कायद्यास विरोध करण्यात आले या कायद्या विरोधात आगामी काळात विरोध मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आले,तसेच आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुका भाजप व त्याच्या मित्र पक्षांचा पराभव करण्यासाठी माकपा कटीबद्ध असून होणाऱ्या निवडणुकीची आगामी दिशा ठरविण्यात आली. किनवट, माहूर विधानसभाक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदेच्या व पंचायत समिती च्या सर्व जागा माकप लढण्याची तयारी सुरु केली असून महाविकास आघाडीतील मित्र पक्ष सोबत समन्वय साधण्याची पक्षाची भूमिका आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्ष सोबत योग्य जागा वाटप झाल्यास युती करून निवडूनकींना समोर जाण्याचे निर्णय घेण्यात आले.

या बाबत मविआ च्या प्रमुख नेत्यांना भेटून आगामी रणनीती ठरवली जाईल तथा माकपला जगावटपट योग्य सन्मान मिळाल्यास युती धर्म पाळू, अन्यथा माकप सर्व जागा लढेल असे मत जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम यांनी व्यक्त केले.

यावेळी माहूर तालुका सचिव किशोर पवार, विनोद गोविंदवार, गंगाधर गायकवाड, जनार्धन काळे, शायलिया आडे, मजुश्री कबाडे, लता गायकवाड, खंडेराव कानडे, सुनीता बोनगीर, संजय मानकर, अमोल आडे आदी माकपाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!