ताज्या बातम्यानांदेडनायगाव

पत्रकारानी समाजहितासाठी सज्ज राहावे ; स.पो. नि. विशाल भोसले.

नायगाव तालुक्यातील पत्रकारांना ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे’ सदस्य ओळखपत्रांचे वाटप.

नायगाव :

पत्रकारांच्या लेखणीतून येणाऱ्या छोट्या-मोठ्या बातम्या शासनाला दखल घ्यायला भाग पाडतात, इतकी ताकद या माध्यमांमध्ये आहे. समाजातील उपेक्षित, वंचित घटकांसाठी व अन्यायाविरुद्ध पत्रकारांनी निडरपणे आवाज उठवावा, असे प्रतिपादन कुंटुर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी केले.                         घुंगराळा येथील ग्रामपंचायत सभागृहात ‘व्हॉईस ऑफ मिडिया, नायगाव’ या संघटनेतर्फे पत्रकार ओळखपत्र वाटप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सह. पोलीस निरीक्षक विशाल भोसले, स्वागताधयक्ष वसंत सुगावे पाटील , जिल्हा संघटक ऋषिकेश कोंडेकर तालुक्यातील .व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व तालुक्यातील पत्रकार शंकरराव अडकिने, आंबटवाड ,अरविंद पाटील शिंदे आधी सह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!