ताज्या बातम्यानांदेडशेती

माहूर तालुक्यात पावसाळ्यात सतत तीन महापुराने शेती चे  खरीप पिकांचे हे १०० % नुकसान.

सरासरी १२०० ते १६०० मिलीमीटर पाऊस पैकी १२०० च्या वर मिलीमीटर पाऊसाची नोंद ;  शासनाकडून ८५ रु. गुंठा नुकसान भरपाई घोषित झाल्याने बळीराजा हवालदिल .

माहूर तालुक्यात पावसाळ्यात सतत तीन महापुराने शेती चे  खरीप पिकांचे हे १०० % नुकसान,

श्रीक्षेत्र माहूर – जयकुमार अडकीने

यावर्षी पावसाळ्याचे सुरुवातीचे १५ दिवस उघाड दिल्या नंतर दुबार पेरणी झाल्यानंतर सुरु झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे संपूर्ण पिक नेस्तनाबूत केल्याने बळीराजाचे संपूर्ण खरीप हंगाम उध्वस्त होऊन रंगवलेल्या सर्व रंगीन स्वप्नांचा चुराडा झाल्याने व शेतकऱ्यांचा ७/१२ करूया कोरा कोरा कोरा म्हणत मते घेणाऱ्या सरकारने ८५ रु. गुंठा एवढी तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर केल्याने बळीराजात २०२५-२६ या खरीप हंगामात तालुक्यात खरीप पिकांचे १०० % नुकसान झाल्याचे आज रोजी धडधडित वास्तव चित्र पहावयास मिळत आहे. माहूर तालुक्यात पावसाची सरासरी १२०० ते १६०० मिलीमीटर पर्जन्यमापनात नोंद असतांना आज पर्यत १२०० च्या वर पावसाची नोंद महसूल विभागात झाली आहे. सरासरी १०० % च्या पाउस पडल्याने खरीप हंगाम आजच पूर्णतः वाया गेली आहे. ओला निर्माण झाल्याने १०० % घट नुकसान झाले आह निसर्गाचा लहरीपण प्रशासनाचा मस्तवालपणा यामुळे तालुक्यातील बळीराजा अधिकच त्रस्त झाला आहे.परिणामी आत्महत्येसारखे आत्मघातकी मार्ग नाईलाजाने पत्करत असल्याचे कटू वास्तव आता समोर येत आहे.                                                                       माहूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ६२५ हेक्टर असून त्यात लागवडीलायक क्षेत्र ३४ हजार ४०० हेक्टर आहे. सन २०२५-२६ या खरीप हंगामात पेरणीलायक क्षेत्र २९ हजार ९८४ हेक्टर आहे यामध्ये भात-७ हेक्टर, ज्वारी ७४३ हेक्टर, तूर २७८३ हेक्टर, उडीद ६९६.९६ हेक्टर,मुंग ५१४ हेक्टर,सोयाबीन ६ हजार ५८१ हेक्टर, कापूस २२ हजार ६२१ हेक्टर, हळद ७० हेक्टर व इतर २७३ हेक्टर खरीपात पिकनिहाय पेरा राहतो. श्रीक्षेत्र माहूर तालुका राज्यात आदिवासी व डोंगराळ भागाने परिचित असतांना कोरडवाहू जमीन क्षेत्र, वनपट्टा, बंज्जर जमीन असल्याने उत्पादनात दरवर्षी घट कायम आहे. जलसिंचनाचा प्रश्न शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कुचकामी धोरणाने शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्यास पुरेसा नाही.                त्यामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत ऐन खरिपाच्या तोंडावर पेरणी करीत असतांना निसर्गाचा लहरीपणा शासनाचे धोरण, निर्णय व प्रशासनातील अधिकाऱ्यांचा योग्य समन्वय नसल्याने शेतकऱ्यांना दिवसेंदिवस असंख्य अडचणींचा सामना करावा लागला त्यातच सत्ताधारी पक्षाचे कोणीही नेते कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पहावयास तयार नाहीत तर पाशवी बहुमत मिळवून सत्तेत आल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना आता कशी जिरवली असे हिणवत आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण देण्यात व्यस्त असून शेतकऱ्यांचा अंत पाहत कोणतीही दखल घ्यायला तयार नसल्याचे कटू वास्तव आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!