
नायगाव : बाळासाहेब पांडे
कुंटूर येथील अल्पभूधारक शेतकरी दादाराव किशन वाघमारे (वय ४०) यांनी सततच्या नापिकीला व बँक कर्जाच्या वाढत्या ओझ्याला कंटाळून दि. ०७ ऑगस्ट २०२५ रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. सदर प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालय समितीने पात्र ठरवून मंजूर केले होते. या अनुषंगाने आज नायगाव तहसील कार्यालयात झालेल्या सभेदरम्यान मे. उपजिल्हाधिकारी श्रीमती क्रांती डोम्बे मॅडम आणि श्रीमती धम्मशिला गायकवाड मॅडम यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी दादाराव वाघमारे यांच्या पत्नी श्रीमती विजयमाला दादाराव वाघमारे यांना शासनाकडून रु. १ लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी नाम फाऊंडेशन तालुका शाखा नायगावचे समन्वयक भाऊराव मोरे, सल्लागार साहेबराव जाधव सर, तलाठी बालाजी मुळे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
धनादेश स्विकारताना श्रीमती विजयमाला वाघमारे यांनी शासन व उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले.

