
नायगाव : बाळासाहेब पांडे
दि. 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत राज्यभर “अंगदान जीवन संजीवनी” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे दिनांक 04 ऑगस्ट रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे सर आणि नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचे निरीक्षण ग्रामीण रुग्णालय नायगावच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपर्णा पुपलवाड मॅडम यांनी केले.
कार्यक्रमात “अंगदान जीवन संजीवनी अभियान पंधरवडा” या उपक्रमाची माहिती डॉ. अपर्णा पुपलवाड मॅडम यांनी उपस्थितांना दिली. यावेळी अंगदानाबाबत जनजागृती करणारे पोस्टर आणि क्यूआर कोड स्कॅनरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सर्व शासकीय कार्यालये व महाविद्यालयांमध्ये अंगदानाच्या ऑनलाईन फॉर्मसाठी क्यूआर कोड स्कॅनरच्या माध्यमातून जनजागृती व फॉर्म भरण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती. अंगदानाच्या महत्त्वाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले असून या अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

