ताज्या बातम्यानांदेड

तीर्थक्षेत्र माहूरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवा ; अन्यथा ६ ऑक्टोबर पासून जिल्हा कचेरी समोर करणार बेमुदत आमरण उपोषण.

कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांचे निवेदन.

जयकुमार अडकिने

माहूर- तीर्थक्षेत्र माहूर ता. माहूर येथील नागरिकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता समस्या सोडविण्याचे लेखी अश्वासने देऊन सुद्धा समस्या न सोडविणारे संबधित अधिकारी व पदाधिकारी यांचे निषेधार्थ व त्यांची चौकशी करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत व नागरिकांच्या प्रलंबित मागण्याची तातडीने पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी शेकडो नागरीकासह दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ :०० वा पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे निवेदन भारतीय राष्ट्रीय पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर केले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड, विभाग नियंत्रक रापम विभाग कार्यालय नांदेड तहसीलदार,माहूर, मुख्याधिकारी नगर पंचायत कार्यालय माहूर, आगार प्रमुख रापम आगार माहूर यांना सादर केल्या आहेत.               माहूर शहर व तालुक्यातील विविध आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना शासनामार्फत ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देणे बाबत तसेच खासगी बांधकाम धारकांना रेती उपलब्ध करून मिळणे बाबत दि.२२/०७/२०२५ रोजी तहसीलदार माहूर यांचेकडून लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले परंतु अंमलबजावणी झाली नाही व अद्याप अनेक जण वंचित आहेत. .                              तसेच माहूर शहरातील पंतप्रधान आवास योजने च्या सन २०१७ पासूनच्या अनेक लाभार्थ्यांचे घरकुल अनुदानाचे हप्ते प्रलंबित असल्याने त्या संदर्भात मुख्याधिकारी नगर पंचायत माहूर यांनी सुद्धा लेखी आश्वासन दिले परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना आद्याप पर्यत थकीत हप्ते मिळाले नाहीत. माहूर नगर पंचायतचे पदाधिकारी व संबधित अधिकारी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करीत आहेत. नगर पंचायत माहूर येथे विचारपूस केली असता घरकुल लाभार्थ्यांच्या हप्त्याची रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र कडे वर्ग करण्यात आल्याची खोटी माहिती दिली व प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम वर्ग न करता लाभार्थ्यापैकी मोजक्याच लाभार्थ्यांची रक्कम वर्ग केली. त्यामध्ये लाभार्थ्यात भेदभाव करण्यात आला नगर पंचायत अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांचे हित संबधीत लाभार्थी यांची यादी देण्यात आली. तसेच माहूर शहरातील तानुशा बानुशा परिसरात एसटी बसला विनंती थांबा मंजूर करणे बाबत. च्या निवेदनाच्या अनुषंगाने रापम आगार माहूर च्या वतीने आगार व्यवस्थापक यांनीजा.क्र./ राप/ आप्र/ प्रशा/ २५/ ४५१ दिनांक १९/०७/२०२५ पत्र देऊन विनंती थांबा सुरु केला परंतु अनेक एसटी बस त्याठीकाणी थांबत नसून रापम त्याबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाही.                 त्यामुळे संबधित प्रशासनाने एकीकडे लेखी आश्वासन पत्रे देऊन उपोषणार्थीची बोळवण करून जनतेची व नागरिकाची फसवणूक केली असल्याने सदर प्रकरणात लेखी आश्वासने देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही न करता नागरिकांच्या अडचणी व समस्याचे भिजत घोंगडे जाणीवपूर्वक कायम ठेवण्यास कारणीभूत असणारे माहूर नगर पंचायतचे पदाधिकारी व अधिकारी व तहसील कार्यालय माहूर येथील संबधित अधिकारी तसेच रापम माहूर आगाराचे सर्व संबधित अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे .                                             तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्यासंदर्भात मी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करीत असून तालुका प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदने सादर करून विनंती केल्या. आमरण उपोषणे आंदोलने देखील केली. त्यावेळी प्रशासनाने वेळ मारून नेण्याचे काम केले तसेच मला लेखी आश्वसने सुद्धा दिलीत. परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याने नागरिकांच्या अडचणीचे भिजत घोंगडे कायम असून अनेक नागरिकांना जीव सुद्धा गमवावा लागल्याचे कटू वास्तव आहे. त्यामुळे आता आरपारचा लढा म्हणून ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे – आनंद पाटील तुपदाळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस नांदेड जिल्हा सरचिटणीस .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!