
श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने
बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार अनुसूचित जमातीची सवलत व आरक्षण मिळाव्या या संदर्भात दि.12/09/2025 ते दि.17/09/2025 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ऑड प्रदीप राठोड आमरण उपोषण बसले होते दि.17 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संपर्क साधून सदरील मागणी आठ दिवसाच्या आत बैठक लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यावरून उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले होते पालकमंत्री अतुल सावे यांनी 17 सप्टेंबर रोजी दिलेले लेखी आश्वासन पूर्तता न केल्यामुळे व मुख्यमंत्री सोबत बैठक न लावल्यामुळे दि.06 ऑक्टोंबर 2025 रोजी अँड प्रदीप राठोड हे आपले मूळ गावी नांदेडच्या किनवट तालुक्यातील निराळा तांडा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अँड प्रदीप राठोड व राहुल चव्हाण हे आमरण उपोषणाला बसले असून या उपोषणाचा 5 वा दिवस सुरू असल्याने किनवट माहूर तालुक्यासह सर्व बंजारा समाजाचा त्यांना पाठिंबा वाढत आहे. स्वतंत्र पूर्वी बंजारा समाज हा आंध्र प्रदेशात होता पण स्वातंत्र नंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी आंध्र प्रदेशातील काही भाग म्हणजेच आजचा मराठवाडा विलीन केले पण जी सवलत आंध्रप्रदेशात अनुसूचित जमाती आरक्षण मिळत होते पण इथल्या राजकीय लोकांनी आमच्यावर अन्याय केला आहे म्हणून बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार अनुसूचित जमाती एसटीची सवलत तात्काळ सुरू करण्यात यावी, बंजारा समाजाला अनुसूचित जमाती ST च आरक्षण देण्यासाठी व ST च्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्यात यावी, ST ची सवलत देण्यासाठी बंजारा समाजाला 10 हजार कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे तसेच पालकमंत्री अतुलजी सावे यांनी दिनांक 17 सप्टेंबर रोजी अमरण उपोषण सोडवताना दिलेले लेखी आश्वासन पूर्ण करावे, तसेच या भारत देशात जनावराला एका नावाने ओळखले जाते परंतु बंजारा समाजाला प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या सूचीमध्ये टाकून समाजाचे तुकडे तुकडे केले आहे बंजारा समाजावर या देशातील राजकीय लोकांनी खूप मोठे धोका व अन्याय केला आहे किनवट तालुका हा पूर्वी तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यामध्ये होता आणि आजही किनवट माहूर तालुक्यात असे हजारो परिवार ज्यांचे एक वडीलाचे दोन मुलं एक मुलगा तेलंगाना राज्यामध्ये आदिवासी ST आरक्षणाची सवलत घेतो आणि दुसरा मुलगा महाराष्ट्रात OBC VJA मध्ये आहे एकच वडीलाचे दोन मुलं त्याची दोन जात कसं असू शकते,आजही आमचे तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात खासरा पाणी निघते, बंजारा समाज या देशाचे मूळ रहिवासी आदिवासी आहे आयोगाने दिलेले पाचही निकष आजही बंजारा समाज पूर्ण करते बंजारा समाज आदिवासी आदिम आहे असे आमच्याकडे हजारो नव्हे तर लाखो पुरावे आमच्याकडे आहे,आणि आदिवासी समाजांना विनंती ही लढाई तुमच्या विरोधात नसून ही लढाई शासनाच्या सरकारच्या विरोधात आहे आदिवासी समाजातील किही राजकीय लोक आपली पोळी भाजण्यासाठी आदिवासी समाजाची दिशाभूल करून बंजारा समाजाविरोधात आदिवासींचे मोर्चा काढत आहे,आदिवासी समाजाचा आरक्षणला धक्का न लागता स्वतंत्र बंजारा समाजाला अनुसूचित जमाती ST B स्वतंत्र आरक्षण देण्यात यावा अशी मागणी आहे असे उपोषण करते अँड प्रदीप राठोड यांनी बोलताना म्हणाले,

