
नायगाव : बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांनी एकरूपतेतून शैक्षणिक गुणवत्तेला चालना देत तालुक्याचा शिक्षण स्तर उंचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन नायगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मा. सुरेश पाटील यांनी केले. ते पंचायत समिती नायगावच्या नूतन प्रशस्त सभागृहात झालेल्या तालुक्यातील सर्व सात केंद्रांच्या एकत्रित ऑक्टोबर महिन्याच्या शिक्षण परिषदेच्या केंद्र संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.या वेळी प्रथमच कोलंबी, गडगा, नरसी, सुजलेगाव, कृष्णूर, नायगाव आणि बरबडा या सर्व केंद्रांचा एकत्रित संमेलन आयोजित करण्याचा ऐतिहासिक निर्णय पाटील यांनी घेतला.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. “गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांची एकजूट हीच खरी शक्ती” — सुरेश पाटील
सुरेश पाटील पुढे म्हणाले नव्याने बदली होऊन आलेल्या शिक्षकांना तालुक्याच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. शिक्षकांनी नायगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी एकात्मतेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षक रत्न पुरस्कार विजेते माधवराव रेडेवाड यांचा गौरव या परिषदेत महात्मा जोतिबा फुले शिक्षण परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय “शिक्षक रत्न पुरस्कार” प्राप्त बरबडा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री. माधवराव रेडेवाड यांचा मा. सुरेश पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. तसेच, उत्कृष्ट केंद्रप्रमुख म्हणून मा. शिवराज साधू (नायगाव केंद्र) आणि कोलंबी केंद्राचा कार्यभार यशस्वीरीत्या सांभाळल्याबद्दल मा. राजेश्वर डोमशेर यांचाही सन्मान करण्यात आला.मान्यवरांची उपस्थिती आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी, पंडित ढगे, विठ्ठल दगडगावे, उद्धव ढगे, तसेच केंद्रप्रमुख मंगेश हनवटे, कपिल गारटे, विरभद्र मिरेवाड, त्र्यंबक स्वामी, कपिलेश्वर नलबलवार, विजय निलंगेकर, संजय कोठाळे आणि बाळासाहेब पांडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन ढगे सर यांनी केले. परिषदेच्या सुरुवातीस तालुक्यात नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या परिषदेला तालुक्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांची मोठ्या संख्येने उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. नायगाव तालुका शिक्षण क्षेत्रासाठी नवा अध्याय ही एकत्रित शिक्षण परिषद नायगाव तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरली असून, प्रभारी पण लय भारी असलेल्या गट शिक्षणाधिकारी सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांची एकजूट आणि नवचैतन्यामुळेतालुक्याच्या शिक्षण दर्जात नक्कीच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास या परिषदेत सर्वांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

