ताज्या बातम्यानांदेडनायगावराजकीय

नायगाव तालुक्यातील आरक्षण सोडतीने राजकीय समीकरणे ढवळली ;  कुंटूरकर, सुगावे, धर्माधिकारी, मनोज मोरे, शेळगावकर,माजी आ. रातोळीकर यांना दिलासा;  खा.चव्हाण परिवार, आ. पवार, ; होटाळकर, भिलवंडे परिवार, लोहगावे यांची अग्नी परीक्षा.

नायगाव : बाळासाहेब पांडे

नायगाव तालुक्यात सोमवारी जाहीर झालेली जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करत आहे. आरक्षणाच्या निकालामुळे काही राजकीय घराण्यांना संधी तर काही मातब्बर राजकीय नेत्यांना आपला मतदार संघ आरक्षित झाल्याने धक्का बसल्याचे चित्र दिसून येत आहे.

सोडती नंतर तालुक्यातील राजेश कुंटूरकर, वसंत सुगावे,दिलीपराव धर्माधिकारी आणि संजय पा शेळगावकर,मनोज मोरे गुत्तेदार याना त्यांच्या होम पिचवर चांगली संधी मिळाली आहे,कुंटूरकर यांच्या पत्नीकडे ओ बी सी सर्टिफिकेट आहे या मुळे त्यांच्या संबंधित समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या प्रभावक्षेत्रातील गण महिलांसाठी राखीव झाल्याने या नेत्यांच्या कुटुंबातील किंवा निकटवर्तीय महिला उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या गटांतील राजकीय समीकरणे बळकट होण्याची शक्यता आहे.

त्याउलट, खा.रवींद्र चव्हाण व चव्हाण परिवार, सर्वच पक्षात काम करणारे भिलवंडे,श्रावण पाटील,रवींद्र पाटील,भास्कर पा. ,संभाजी पाटील व भिलवंडे परिवार,शिवराज पाटील होटाळकर, आमदार पवार यांच्या सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्या पूनम ताई यांच्या प्रभावाखालील असलेले स्वतःचे मतदारसंघ आरक्षणाच्या फेरबदलात राखीव ठरल्याने त्यांच्या राजकीय समीकरणात अनपेक्षित बदल झाला आहे. या नेत्यांच्या मतदारसंघात आता नवीन चेहरे उदयास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, यंदाची सोडत “संतुलन” साधणारी असली तरी तिचा थेट परिणाम पुढील निवडणुकीच्या उमेदवारीवर होणार आहे. विशेषतः पंचायत समिती व जिल्हा परिषद गट ओबीसी महिला सभापती व जिल्हाध्यक्ष महिलांसाठी राखीव झालेल्या गणांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर नायगाव पंचायत समिती सभापती पद व जिल्हा परिषद अध्यक्ष पद नामा प्रवर्ग महिला साठी आरक्षित असल्याने अनेक राजकीय मंडळी महिला ना समोर रिंगणात उतरवून पडद्या आडून राजकारण करण्याची शक्यता नकरता येत नाही….

आरक्षणामुळे काहींची राजकीय गाडी वेग पकडणार तर काहींचे समीकरण पुन्हा मांडावे लागणार आहे. त्यामुळे नायगाव तालुक्यातील ही निवडणूक “नव्या चेहऱ्यांचा उदय की जुन्या बालेकिल्ल्यांची परीक्षा?” असा प्रश्न उपस्थित करत आहे.

कुंटुरकर व होटाळकर

याना माहेरचा आहेर

राजेश कुंटूरकर,व शिवराज पाटील यांच्या पत्नी ना माहेर हून ओबीसी सर्टिफिकेट चा आहेर मिळाल्याने व जिल्हा परिषद अध्यक्ष पद ओबीसी महिला व असल्याने या दोघात कुंटूर मध्ये लढत होणार का तिसरा ओबीसी उगवणार याची ही चर्चा सर्वत्र रंगत दार होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!