ताज्या बातम्यानांदेडनायगाव

नायगावात दहावी परीक्षेसाठी ३१८० विद्यार्थी नोंदणीकृत; ६० अनुपस्थित.

नायगाव :

येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ३ हजार १८० विद्यार्थी नोंदणीकृत असून त्यापैकी ३ हजार १२० विद्यार्थी उपस्थित राहिले, तर ६० विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती परीरक्षाकेंद्र कार्यालयाने दिली आहे.

नायगाव तालुक्यातील विविध केंद्रांवर परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडली. श्री साईबाबा कन्या शंकरनगर (१२८ पैकी १२५ उपस्थित), गो.म.प. स्कूल शंकरनगर (१३७ पैकी १३६), श्री शिवाजी मा.वि. हुम्बडा (२२६ पैकी २२२), जि. नेहरू वि. बऱ्हाडा (३२७ पैकी ३२३), जि.प.हायस्कूल धुंगराळा (१८९ पैकी १८३) या केंद्रांवर काही विद्यार्थी गैरहजर होते.

पो. बे. आ. मरवाली तांडा केंद्रावर ३७८ पैकी ३६८ विद्यार्थी उपस्थित राहिले असून येथे सर्वाधिक १० विद्यार्थी अनुपस्थित होते. जनता हायस्कूल नायगाव (३४४ पैकी ३४३) व यमुनाबाई मा.वि. नायगाव (२७५ पैकी २७४) येथे प्रत्येकी एक विद्यार्थी गैरहजर होता.

जि.प. हायस्कूल कुटूर (२३६ पैकी २३१), श्री शंकरराव विद्यालय कोलंबी (२४२ पैकी २३७), ब्ल्यू बेल्स स्कूल नायगाव (१६९ पैकी १६७), मा.आ.शा. कुटूर तांडा (३२८ पैकी ३१३) व राणी लक्ष्मीबाई के.वि. नरसी (२०१ पैकी १९८) या केंद्रांवरही काही विद्यार्थ्यांची अनुपस्थिती नोंदविण्यात आली.ही सर्व माहिती परीरक्षा प्रमुख आनंद रेंनगुंटवार सर व सहायक परिक्षक एस.डी. पाचलिंग सर यांनी दिली.

एकूणच परीक्षेचा पहिला पेपर शांत वातावरणात पार पडला असून प्रशासनाच्या व केंद्रप्रमुखांच्या दक्षतेमुळे परीक्षा सुरळीत झाली.आज कोलंबी परीक्षा केंद्राला नायगाव गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील,विस्तार अधिकारी उद्धव ढगे,केंद्र प्रमुख त्र्यंबक स्वामी यांनी पेपर चालू होतानाच भेट दिली.

विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर होऊन परीक्षेला सामोरे जावे. : गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील.

बारावी परीक्षे बरोबरच दहावी परीक्षेला वीस तारखे पासून सुरुवात झाली असून दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपण परीक्षेच्या दृष्टीने केलेली तयारी लक्षात घेऊन आत्मनिर्भर पणे परीक्षेला सामोरे जाऊन कॉपी न करता मनाची स्वतः तयारी करून परीक्षा दिल्यास यश आपल्याला हमखास मिळणारच असे विचार नायगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील यांनी व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!