ताज्या बातम्यानांदेड

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सकल मराठा समाजातर्फे माहुरात विजयउत्सव साजरा!.

माहूर – मराठा आरक्षण संदर्भात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील त्यांनी 29 ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले होते राज्यभरातून कोटीच्या संख्येने मराठी मुंबई दाखल झाले. या उपोषण आंदोलनाची दखल घेऊन जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या व मराठा आरक्षण उपसमिती चे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जी आर स्वीकारत मनोज जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी आमरण उपोषण सोडले. चार महिन्यापूर्वी उपोषणाची तारीख जाहीर करतानाच जरांगे पाटील यांनी मी मुंबईला गेलो तर आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला होता, त्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढूनच आपले आमरण उपोषण थांबविले याचा माहूर तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे माहूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री दत्त चौक टी पॉईंट माहूर येथे अभिवादन करून संघर्ष योद्धा जरांगे पाटील व आंदोलनातन-मन-धनाने सहभागी होणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांचे आभार मानले व अभिनंदन केले, फटाक्याची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा विजय उत्सव उत्साहात साजरा केला. यावेळी माझी उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कराळे, डॉक्टर पद्माकर जगताप जयकुमार अडकिने, विनोद सूर्यवंशी अनिल पाटील हडसणीकर ऍड. अविनाश ढगे, ऍड. उज्वल भोपी, प्रसाद चौधरी, गणेश वाडेकर, संजय घोगरे मंगेश सूर्यवंशी, वैभव जाधव, निखिल शिंदे, सचिन देशमुख, दादाराव सूर्यवंशी, तुळशीराम ठाकरे, अशोक माने, रामचंद्र भुसारे, राजु सोळंके, राजकिरण देशमुख, आदी सह शेकडो मराठा कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!