Uncategorizedऐतिहासिकताज्या बातम्यानांदेडनायगाव

राहेर तीर्थक्षेत्रात वेद पाठशाळा व गोशाळा उभारण्याची मागणी

अमित शहा यांच्या भाषणात राहेर चा नामोल्लेख

 

नायगाव,
श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर संस्थान, राहेर यांच्या वतीने राज्यसभा खासदार मा.ना. अजित गोपछडे यांच्याकडे राहेर येथील तीर्थक्षेत्र परिसरात वेदपाठशाळा व गोशाळा सुरू करण्याची मागणी करणारा औपचारिक निवेदन सादर करण्यात आल आहे.गोपचडे नकीच लक्ष घालतील असा विश्वस्त यांना विश्वास
राहेर हे प्राचीन व ऐतिहासिक महत्वाचे तीर्थक्षेत्र असून, मराठवाड्यात “देवाचे माहेरघर” म्हणून प्रसिद्ध आहे. हे स्थळ राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित असून, केंद्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेत ‘क’ दर्जा लाभलेला आहे. येथे गोदावरी काठावर चार नरसिंह मंदिरांचा समावेश असून, ही स्थळे सध्या उपेक्षित स्थितीत आहेत.
मंदिर संस्थानच्या माहितीनुसार, अंदाजे २५ एकर जागेवर वेदपाठशाळा, गोशाळा, अन्नछत्र, तसेच पैठणच्या धर्तीवर भव्य बागबगिचा व वृक्षारोपण प्रकल्प उभारण्याचा मनोदय आहे. या उपक्रमांना केंद्र शासनाच्या योजना उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब होत असल्याने खासदारांनी तात्काळ लक्ष घालावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
खासदारांनी स्थळास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, अशीही नम्र मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासोबतच निवेदनाची प्रत मा. देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र), पर्यटन मंत्री, आमदार राजेश पवार आणि जिल्हाधिकारी नांदेड यांनाही पाठविण्यात आली आहे.
हा प्रस्ताव धार्मिक पर्यटन व ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे मत संस्थानचे विश्वस्त धनंजय देशमुख आणि संतोष जोशी यांनी व्यक्त केले आहे.

 

नांदेड दौऱ्यात अमित शहा यांच्या कडून राहेर तीर्थक्षेत्राचा नामोल्लेख झाला असून देशाचे गृह मंत्री जेव्हा वंदन करतात तेव्हा या भागातले खासदार अजित गोपचडे हे हिरीरीने भाग घेऊन हा प्रश्न सोडवतील असा विश्वास धनंजय देशमुख विश्वस्त यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!