
नायगाव: : बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यातील आलूवडगाव येथील माजी सरपंच तथा पाचपिंपळीच्या कृषी विद्यालयातील शिक्षक संभाजीराव देवराव पवार(४८) यांचे २ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ऱ्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी आकरा वाजता आलूवडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अत्यंत शांत, संयमी, मितभाषी स्वभावाच्या संभाजी पवार यांच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.छातीत तीव्र वेदना सुरू झाल्याने त्यांना नायगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेची माहिती समजताच आमदार राजेश पवार यांनी रूग्णालयात धाव घेतली.दिवगंत संभाजी पवार यांच्या पश्चात आई, दोन बहिणी, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

