ताज्या बातम्यानांदेड

पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देण्यास कोणतीही कसर ठेवणार नाही! – कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांची ग्वाही .

जयकुमार अडकिने

माहूर- पक्षाच्या अडचणीच्या काळात सुद्धा पक्षाशी एकनिष्ठ राहून ठाम असणाऱ्या कार्यकर्त्यांची नोंद घेतल्या जाईल व पक्षाचे निष्ठापूर्वक काम करेल अशा कार्याकर्त्याला कॉंग्रेस पक्षा तर्फे सर्वतोपरी बळ देण्यास कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी दिली. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच माहूर तालुका दौऱ्यात शासकीय विश्राम गृह माहुर येथे दि. १६ रोजी संपन्न झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यांचे समवेत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. सौ. रेखाताई चव्हाण, एनएसयु आयचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील हे होते.

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव डॉ. निरंजन केशवे,विजाभज सेल चे जिल्हाध्यक्ष किसन राठोड, जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख शिऊरकर, शहराध्यक्ष अजीम सय्यद, युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अनिल पाटील, राजू सौंदलकर, महिला कॉंग्रेस शहराध्यक्ष नगरसेविका सौ. कविता राजू सौंदलकर, युवती कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सौ. पृथ्वी बरडे, सुमैय्या शेख, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष करीम शहा, नगरसेवक प्रतीनिधी निसार कुरेशी,विक्रम राठोड, सेवा दल तालुकाध्यक्ष भागवत जायभाये, लुकमान शेख, शौकत भाई, फयाज फारुकी,अमजद पठान, सरपंच कुंडलिक तोडसाम, संतोष मुसळे,प्रवीण बरडे,आनंदराव कलाने, आकाश शिंदे, देवानंद जाधव, ईश्वर काळे, गणेश भगत,गणेश मूर्खे सुभाष इंगोले, प्रशांत काळे, अरविंद काळे, आदीसह कॉंग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष पावडे यांनी माहूर तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुका बाबत कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे व जन सामन्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम करावे जिल्हा स्तरावरील कोणत्याही कार्यालयात अडचण आल्यास ती दूर करण्यासाठी आपण व जिल्हा कॉंग्रेस कमिटीची टीम सज्ज राहू अशीही ग्वाही दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस डॉ. रेखाताई चव्हाण , युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव डॉ. निरंजन केशवे, वि.जा.भ.ज. सेल जिल्हाध्यक्ष किसन राठोड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले बैठकीचे सूत्रसंचलन कॉंग्रेस तालुका कार्याध्यक्ष जयकुमार अडकीने यांनी व आभार प्रदर्शन फयाज फारुकी यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!