
पोलीस खात्यात राहून लोकांच्या सुखदुःखात सहभाग होत त्यांच्या मनात ठाव घेत सेवा करण्याची वृत्ती जोपासणारे आदर्श दानशूर व्यक्तिमत्व असलेले लक्ष्मणराव माधवराव वाघमारे सोनखेडकर यांच्या समाज उपयोगी कार्याबद्दल जेवढे बोलले व जेवढे लिहिले तेवढे कमीच म्हणावे लागेल.त्यांच्या पुण्यतिथी निमित्त लेख देत आहोत.
आयुष्य पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या लक्ष्मणरावनी आयुष्यभर सत्याचा मार्ग स्वीकारत धार्मिक भावना जोपासल्या. पोलीस खात्यात नोकरी नंतरच्या सेवा निवृत्तीच्या काळात त्यांनी आपल्या परिवारातील तिन मुली व पाच मुलांना उच्च शिक्षा देत त्यांना समाजात उंच माथ्याने जगण्याचा मार्ग दाखविला. आपल्या कुटुंबात सुसंस्कृत जिवनात आदर्श निर्माण करण्याची शिकवण देत त्यांनी पोलीस खात्यात असताना व सेवानिवृत्ती नंतर मिळालेल्या रिकाम्या वेळेत धार्मिक कार्यात स्वतःला झोकून दिले.
लोकांना उच्च विचारसरणी व साधी रहाणीचा उपदेश करत त्यांनी आत्मबोध गीतगंगा, दत्त महिमा, सह पाच प्रबोधन करणाऱ्या पुस्तकांचे लिखाण केले.या कामी त्यांना शरदचंद्र महाविद्यालये प्राचार्य सु.ग.चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्यांनी लिखाण केलेल्या धार्मिक पुस्तकांचे सर्वत्र थरातून स्वागत झाले. पोलीस दलात राहून धार्मिक पुस्तक लिहिणारे व समाज मने जोडणारा या अवलिया पोलीस जमादाराच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यासाठी तात्कालीन पोलीस अधीक्षक व्हि.व्हि.लक्ष्मीनारायण, शारदा प्रसाद यादव या दिग्गज अधिकाऱ्यांनी उपस्थीती लावत आपल्या खात्यातला व्यक्ती असा आदर्श निर्माण करु शकतो याबद्दल भरभरून कौतुक केले. लक्ष्मणराव हे जेवढे कुंटूबाच्या संवेदना जपायचे तेवढ्याच प्रमाणात लोकांच्या भावना जपायचे.
पोलीस खात्यात उभे आयुष्य घालणारे लक्ष्मणराव यांना कार्याची मोठी आवड होती त्यांनी मांजरम पोलीस चौकी येथे पोलीस जमादार संभाळत असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ,पोलीस चौकी सह अन्य शासनाला इमारती उभारण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने स्वत्वाची पाच एकर रस्त्यालगत असलेली जमीन दान देवून समाजात पुढे मोठा आदर्श निर्माण केला.
त्यांच्या या आदर्श व दानशूर पणाचे पोवाडे आजही मांजरम व तालुक्यात गायले जातात.
धोबी समाजात जन्मलेल्या लक्ष्मण रावांनी आयुष्यात कधीही कोणाला नुकसान होईल अशा पद्धतीची वागणूक केली नाही.आज प्रगतशील असलेल्या पण त्या काळात छोटेसे खेडे असलेल्या सोनखेड सारख्या गावात अशिक्षित परिवारात जल्म घेवून दोन चार पुस्तकं शिकून पोलीस दलात सामील झाल्या नंतर आपल्या परिने कुटूंब भावभावकी साठी आणि समाजासाठी जेवढे करता येईल ते कार्य करत जन जागरण अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यत्यांनी केले.राष्ट्रसंत गाडगेबांबाच्या विचारांचा त्यांच्या वर मोठा प्रभाव असल्याने त्यांनी समाजातील चालणाऱ्या वाईट चालीरिती प्राण्यांच्या बळीला विरोध करत जन जागरण करण्याचे किमी केले.
लोकांकडून कांहीं घेण्यापैक्षा आपण समाजाला काहीतरी दिले पाहिजे हा दानशूर पणा लक्ष्मणराव यांनी आयूष भर जपला आणि लोककल्याणकारी उपयोगा साठी पाच एकर शेतीचे दान करत जहाजात मोठा आदर्श निर्माण केला. कार्तिक मासातील त्रिपुरी पोर्णीमेला दि.१४ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांचे निधन झाले.८५ वर्ष आयूष लाभलेल्या या निर्मळ मनाच्या झऱ्याने लोकांना चांगल्या जगण्याचा व परोपकाराची शिकवन देण्यासाठी आपले आयुष्य झिजविले.त्यांच्या या कार्यास विनम्र अभिवादन लेखक::भुजंगराव माणिकराव कौठेकर सेवानिवृत्ती कॅनॉल इन्स्पेक्टर .

