ताज्या बातम्यानांदेडनायगाव

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष राहील ; आ. प्रतापराव पाटील चिखलीकर.

वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने घुंगराळा येथे बरबडा जिल्हा परिषद गटाचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न.

नायगाव :

घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने बरबडा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि ₹८३ लाखांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास मुख्य उद्घाटक म्हणून आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, तर अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहनराव हंबर्डे उपस्थित होते.                                                          प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, प्रदेश सरचिटणीस मोहम्मद खान पठाण, डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर, दिलीपराव धर्माधिकारी, माजी सभापती स्वप्नील चव्हाण, माधवराव पावडे, उत्तमराव सोनकांबळे, विश्वनाथराव बडुरे, आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती.       विकासाची नवी दिशा — वसंत सुगावे पाटील यांचा संकल्प।   प्रास्ताविकात बोलताना वसंत सुगावे पाटील यांनी गावातील सुरू असलेल्या व येणाऱ्या विकासकामांची माहिती देत, लवकरच घुंगराळा हे गाव संपूर्णपणे सीसीटीव्ही निगराणीखाली आणले जाईल, असे सांगितले.

तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. वर्षाताई सुगावे यांच्या उमेदवारीची मागणी त्यांनी पक्षाकडे केली असून, बरबडा गटातून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

“सुगावे यांच्या कार्यशैलीचे कौतुक” आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

आपल्या मनोगतात आ. प्रतापराव चिखलीकर म्हणाले की, “वसंत सुगावे हे अधिकारी आणि जनतेशी सुसंवाद साधून स्वतःच्या मेहनतीने निधी खेचून आणतात. त्यांच्या कामगिरीचा पक्ष नक्कीच सकारात्मक विचार करेल. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष राहील.                                                      “विकासासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणजे सुगावे” — माजी आ. मोहन हंबर्डे।                                                       माजी आ. मोहन हंबर्डे यांनीही आपल्या भाषणात वसंत सुगावे यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत म्हटले,          “सुगावे हे विकासासाठी झटणारे, जनतेच्या प्रश्नांवर काम करणारे कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांशी त्यांची बांधिलकी दृढ आहे.                                     बरबडा सर्कलमधून मोठी उपस्थिती।                              या मेळाव्यास गंगणबीड, नरंगल, हिप्परगा, निळेगव्हाण, कृष्णूर, कहाळा (बु.), कहाळा (खु.), सावरखेड, रुई (बु.), मनूर, आंतरगाव, बरबडा, मांडणी, पळसगाव, सोमठाणा, टाकळी, पाटोदा, वजीरगाव, टाकळगाव आदी गावांतील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना बळ देणारा आणि विकासाभिमुख कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!