ताज्या बातम्यानांदेड

दोन महिलांचा खून करणाऱ्या आरोपीस आठ दिवस आधी लुटल्या गेलेल्या तिसऱ्या महिलेने ओळखले ; दोन्ही आरोपी विरुद्ध जीवे मारण्याच्या प्रयत्न करून लुटमार केल्याचा गुन्हा दाखल .

श्रीक्षेत्र माहूर  : जयकुमार अडकिने

मौजे पाचुंदा येथे दोन महिलांचा खून करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर मोजे पानोळा येथील एका महिलेस आठ दिवसाआधी जीवे मारण्याचा प्रयत्न करून लुटण्याचा प्रकार घडला होता या चौकशी अंतर्गत सदरील महिलेस माहूर पोलीस ठाण्यात आणून अटक केलेल्या आरोपीची ओळख पटविली असता महिलेने तात्काळ त्या दोन्ही आरोपींना ओळखून याच आरोपींनी मला महाराणा करून जीवे मारण्याचा प्रयत्न करत सोने चांदी नगदी रक्कम लुटून नेल्याची कबुली जबाब दिल्याने त्या दोघां वर पुन्हा माहूर पोलीस ठाण्यात दि 22 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मौजे पानोळा येथील सौ सुशीला विष्णू राठोड वय 50 वर्ष ह्या दिनांक 09/11/2025 रोजी दुपारी 02.00 वाजताचे सुमारास आपल्या स्वतःच्या शेतामध्ये कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या त्यांनी माहूर पोलीस ठाण्यात जवाब दिल्याप्रमाणे रविवार वानोळा येथील आठवडी बाजार असल्याने माझे पती मी आल्यांतर बाजार करण्यासाठी वानोळाला निघुन गेले. तेव्हा मी, शेतात एकटिच होती कापुस वेचत असतांना दुपारी 03.30 वाजताचे सुमारास एक अनोळखी इसम माझ्या समोर आला. त्यास मी, काय आहे म्हणुन विचारले असता तो माझ्या अंगावर येवुन मला खाली पाडुन गळ्याला दाबुन धरले. मी त्यास मारु नको असे म्हणाले त्यानंतर तो माझ्या अंगावरुन उठला त्याने मला ओढत मारत बंडू आडेच्या शेताजवळ घेवुन गेला. तेथे चाकु काढला व त्याने मला अंगावरील दागिने काढुन दे म्हणुन चाकुचा धाक दाखवुन धमकी दिली तेव्हा मी,3600/- रुपये पायातील चैन जोडवे तीन तोळे जुवा कि.अ.

24000/- रुपये गळ्यातील दोन ग्राम सोन्याचे मंगळसू 12000/- रुपये 10 तोळे पायातील चैन 3600/- रुपये कानातील तीन ग्राम सोन्याचे रिंग जु.वा.कि.अ एकुण कि.अं. 75600/- रुपये

वरिल वर्णनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने चाकुचा धाक दाखवुन जबरीने धमकीन काढुन घेतले. त्यावेळी त्याला वरच्यावर फोन येत होता. तो कट करत होता. सदरिल शेत पानोळा जुनापानी रोडवर असुन शेताच्या पलीकडे एक मोटार सायकल घेवुन उभा होता. त्याचा तो साथीदार होता. तेव्हा मी, या अनोळखी इसमास मला मारु नको सोडुन दे म्हणुन विनंती केली. त्याने सदरचे घटना कोणास सांगतीलस तर तुला जिवानिशी मारुन टाकतो. म्हणुन धमकी दिली तेव्हा तुझ्या विषयी मी कोणाला काही सांगत नाही. तु मला सोडुन दे म्हणुन विनंती केल्याने तो सोडुन निघुन गेला. त्याने मला कोणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्या ईसमांना माझ्या समोर हजर केल्यास मी त्यांना ओळखीन

सदरील महिलेने अशी फिर्याद दिल्याने अटक केलेल्या आरोपींना त्या महिलेस दाखवून ओळख परेड केली असता महिलेने तात्काळ त्या आरोपींना ओळखले

त्या दोघा विरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील कारवाई पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद घोडके हे करीत असून पोहेका गजानन चौधरी सत्यपाल मडावी सारिका राठोड शिल्पा राठोड हे मदत करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!