ताज्या बातम्यानांदेडनायगाव

कुंटूर परिसरात व्यायाम शाळा नामसेस तरुण वर्गांना व्यायामासाठी फिरावे लागते रस्त्याने तरुण वर्गांना व्यायाम शाळांचे साहित्य पुरवा तरुणांची मागणी.

कुंटूर अनिल कांबळे

नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मोजे कुंटूर सहित एकूण 22 गावांमध्ये व्यायाम शाळा चे कोणतेही साहित्य उपलब्ध नाही त्यामुळे तरुण वर्ग व जवान विद्यार्थी यांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व आरोग्य शिक्षण घेऊन सैनिक होण्यासाठी लागणारे साहित्य सहित आरोग्याची काळजी घेणारे साहित्यही मिळत नाही त्यामुळे त्यांचे आरोग्य ढासळत आहे. त्यातच त्यांना स्पर्धा परीक्षा देऊन त्यातही पोलीस  आर्मी अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी गावात व्यायाम शाळा उभारणे हे काळाची गरज आहे. त्यातच ग्रामीण भागामध्ये बावीस गावांपैकी तेरा गावांमध्ये व्यायाम शाळा नोंदणी झाली असल्याचे स्पष्ट दिसून ? येत आहे. त्या नोंदणीमध्ये त्या गावांना अनुदानही प्राप्त झाले आहे. असून व्यायाम शाळेचे साहित्य घेतले असल्याचे वरिष्ठ अधिकारी व क्रीडा विभाग नांदेड यांनी सांगितले . त्यामुळे व्यायामशाळाचे साहित्य नाही व व्यायामशाळा उपलब्ध नाहीत असे चित्र दिसून येत असून तरुण वर्ग व विद्यार्थी यांना व्यायामाचे धडे देणार कसे, त्यांचे आरोग्य सुधारून त्यांनी चांगल्या क्षेत्रात प्रगती करावी असे सर्वांना वाटते मात्र साहित्य उपलब्ध नसल्याने त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे . त्यामुळे त्यांनी आपल्या शरीर सृष्टी वाढवण्यासाठी रस्त्याने जॉगिंग करणे व व्यायाम करणे अशी पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे कुंटूर परिसरातील सदर व्यायाम शाळांची चौकशी करण्यात यावी व सदर विद्यार्थ्यांना साहित्य पुरवण्यात यावे व व्यायाम शाळा सुरू करून देण्यात यावी अशी मागणी तरुण वर्ग व विद्यार्थ्याकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!