
कुंटूर : शंकरराव अडकिने
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे ईकळीमाळ तालुका नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे .या शाळेची गुणवत्ता विद्यार्थी शैक्षणिक सुधारणा बोलक्या भिंती डिजिटल शाळा शाळेचा हिरवागार परिसर क्रीडांगण साहित्य पोषण आहार सर्व उत्कृष्टरित्या तपासल्यानंतरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इकलीमाळ आयएसओ मानांकन प्राप्त प्रमाणपत्र गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव तालुका नायगाव यांच्या हस्ते देण्यात आले .यावेळी गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश हनवटे केंद्रप्रमुख, किरण पंढरीनाथ डोंगरीकर , प्रकाश जाधव पाटील विस्तार अधिकारी, रणवीर गणेश बाबाराव, भीमराव जमनाजी जोंधळे पोलीस पाटील, आर टी पवार बीड प्रमुख, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक ग्रामपंचायत अधिकारी विद्या मोरे ग्रामपंचायतचे सेवक कर्मचारी सरपंच सौभाग्यवती रेखा सूर्यवंशी ,उपसरपंच चंद्रकला गिरी ,व गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इकळीमाळ व ग्रामपंचायत इकळी माळ यांच्या संयुक्त कार्यक्रमांतर्गत आयएस मानांकन प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत वेळोवेळी गावातील स्वच्छता , वृक्ष लागवड, वनराई बंधारे गावातील रस्ते नाली अशा अनेक सुविधा शाळेची इमारत ग्रामपंचायतची इमारत नागरिकांना सोयीसुविधा डिजिटल प्रमाणपत्र देण्याच्या सर्व सोयी व चांगल्या प्रकारे उपयुक्त कामे केल्याबद्दल ईकळीमाळ ग्रामपंचायत च्या मानाचा तुरा मिळाला असून आयएसओ ग्रामपंचायत 2024 ला झाल्या असून दुसऱ्यांदा रिन्यूअल ग्रामपंचायत म्हणून पुन्हा इकलीमाळाची ओळख झाली असून त्याच बरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आयएसओ नामांकन झाल्याबद्दल यांना दोनदा ट्रॉफी प्रमाणपत्र मानाचा मिळाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. नागरिकांना सोयीसुविधा पुरवणे गावातील स्वच्छता सर्व स्तरातून पाणीपुरवठा रस्ते नाले वीजपुरवठा विविध कामे ग्रामपंचायत इमारत व शाळेतील वर्ग खोल्या डिजिटल शाळा विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी व शैक्षणिक आरोग्य तपासण्याच्या विविध कार्यक्रमा घेऊन कार्यक्रम राबवून गावातील शाळा सहित ग्रामपंचायत डिजिटल केल्याने ग्रामपंचायत अधिकारी विद्या मोरे यांनाही सन्मानित करण्यात आले व यावेळी गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून इकलीमाळ येथील आयएसओ नामांकन कार्यक्रमास सर्व नागरिकांनी प्रतिसाद दिला असून यापुढेही असेच कामे करणार आहे अशी ग्वाही यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विद्या मोरे यांनी दिले आहे.


