ताज्या बातम्यानांदेडपर्यावरण

चार महिन्यापासून कोरडा पडलेला नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहिला.

 

 

चार महिन्यापासून कोरडा पडलेला नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहिला.

नांदेड जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. मागील चार महिन्यापासून नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवरील कोरडा पडलेला सहस्रकुंड धबधबा आज खळखळून वाहिला. पैनगंगा नदी संपूर्ण कोरडी पडली होती. त्यामुळे हदगाव, हिमायतनगर,किनवट आणि माहूर या तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. यवतमाळ,हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला. सहस्रकुंड इतिहासात पहिल्यांदाच कोरडा पडल्याने चाळीस गावाचा पाणी प्रश्न गंभीर बनला होता. परंतु सततच्या अवकाळी आणि त्यानंतर मान्सूनच्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. पैनगंगा नदीला आणि सहस्त्रकुंड येथे पाणी आल्याने अनेक गावाच्या पाण्याचा प्रश्न मिटला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!