ताज्या बातम्यानांदेड

रिफ्लेक्टिव टेप लावल्याने अपघात कमी होण्यास मदत

आरटीओ इन्स्पेक्टर अभिजित कोळी यांचे प्रतिपादन  माहूर शहरातील सर्व वाहनास लावल्या रिप्लेक्टिव्ह टेप.

श्रीक्षेत्र माहूर  : जयकुमार अडकिने

तीर्थक्षेत्र माहूर शहर हे पवित्र देवस्थानाचे ठिकाण असल्याने येथे लाखोच्या संख्येने वाहने येतात तर गडावर जाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात आटो चा वापर करतात त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून पुढील बाजूस पांढरे, बाजूला पिवळे आणि पाठीमागे लाल रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे , रात्रीच्या वेळेस प्रवास करताना या वाहनांवरील रिफ्लेक्टिव टेप रिफ्लेक्ट होतात आणि दुसऱ्या वाहनास अंदाज येऊन अपघाताची शक्यता कमी होते, असे मत आरटीओ इन्स्पेक्टर अभिजित कोळी यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी इन्स्पेक्टर अभिजीत कोळी यांनी गडावरील येणारी जाणारे वाहने सुरक्षित रहावी अपघात होऊ नये यासाठी घाटासह वळणदार रस्त्यावर विविध प्रकारचे बॅनर सूचनाफलक लावून भाविक व नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा अपघात होऊ नयेत यासाठी शासन नियमानुसार सर्व उपाययोजना करण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले नागरिकांनी नियमांचे पालन करावे लहान मुलांना वाहने चालवू देऊ नये तसेच वाहनाची कागदपत्रे इन्शुरन्स बनवून घ्यावीत सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला

दि 22 रोजी माहूर शहरातील बाहेरून आलेली सर्व वाहने आणि रिक्षांना रिफ्लेक्टर टेप कश्या प्रकारे लावावे याचे मार्गदर्शन करण्यात आले आणि आणि शेकडो रिक्षांना रिफ्लेक्टिव टेप चिटकविण्यात आले यावेळी इन्स्पेक्टर अभिजीत कोळी इन्स्पेक्टर श्रीमती रेणुका राठोड, आरटीओ इन्स्पेक्टर मंगेश गवारे तसेच वाहन चालक प्रकाश जायभाये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!