
जयकुमार अडकिने
माहूर -महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम या उपक्रमा अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माहूरचे_वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित सिद्राम जाधव यांचा राज्य शासनाने प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.
शासनाच्या या मोहिमेत छत्रपती संभाजी नगर विभागातून राज्यातील १२,४०० शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये माहूर वन परिक्षेत्र कार्यालयाने उल्लेखनीय कार्य करून द्वितीयक्रमांक पटकावला. त्यांच्या या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्वाक्षरीनिशी गौरवपत्र प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे.शासनाच्या या प्रशस्तीपत्रामुळे माहूर वन परिक्षेत्र कार्यालयाचा मान उंचावला असून अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
“हा सन्मान माझा नसून संपूर्ण माहूर वन परिक्षेत्र कार्यालयातील सहकाऱ्यांच्या मेहनतीचा गौरव आहे. या पुढेही पारदर्शकता व प्रामाणिकपणे जनतेचे कार्य केले जाई
– रोहित जाधव वन परिक्षेत्र अधिकारी माहूर

