ताज्या बातम्यानांदेडनायगावप्रशासकीय

कुंटूर वॉटर सप्लाय डिपीचे किटकॅट केबल खराब ; वारंवार विजपुरवठा खंडीत.

कुंटूर

कुंटूर गावातील वॉटर सप्लाय डिपीचे (DP) व त्यावरील किटकॅट केबल काही दिवसांपासून खराब अवस्थेत आहे. त्यामुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याचे दिवस आहे साप विंचू, डांस याचा प्रादुर्भाव आहे. डासांमुळे मलेरिया , डेंग्यू, ताप, यांचा प्रादुर्भाव होत आहे नागरीकांच्या तक्रारी असूनही महावितरण विभागाकडून याकडे गंभीरतेने पाहिले जात नसल्याचे चित्र दिसत आहे.                  गावातील पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत या रोहित्रावर अवलंबून असून केबलच्या बिघाडामुळे मोटार सुरु होत नाही. परिणामी पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांना तहानमेली अवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन किटकॅट केबल बदलून वॉटर सप्लायचा गावातील विज पुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घ्यावी केबल किटकॅट बसवून विज पुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!