
कुंटूर :
परडवाडी येथील जिल्हा परिषद प्रा. शालेचे मुख्याध्यापक शेख राजेसाब सर यांचे बदली झाल्यामुले गावकरी मंडलीच्या वतीने त्याचा निरोप सभारंभ आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. संगिता गोविंदराव परडे ह्या होत्या. अध्यक्षीय समारोप करताना त्यानी राजु सरांनी प्रामानीकपणे विद्यार्थी घढवण्याचे कार्य केले ,त्यामुले आमचे गाव आपनास कायम स्मरनात ठेवील असे गौरव उद्गगार काढले. ‘ शिक्षक हा राष्ट्रनिर्मीतीचा शिल्पकार असतो ‘ म्हणुन शिक्षकाचे स्थान समाजात समाजात फार महत्वाचे असलल्याचे नमुद करून सरांनी भविष्यातही हे कार्य चालु ठेवावे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेली कार्यक्रमास गट शिक्षण अधिकारी सुरेश पाटिल सर, विस्तार अधिकारी पंडितराव ढगे सर, विस्तार अधिकारी उध्दव ढगे सर ,गट समन्वयाक मंगेश हानवटे सर आणि महेश कुंटूरकर सर यांची प्रमुख उपस्थिति होती. या सर्वांनी यावेली आपले मनोगत व्यक्त करताना राजु सरांचे आणि गावकरी मंडलीचे कौतुक केले.
यावेली डोमेशेर सर, पाटील सर, मीसे सर, स्वामी सर ,ब्रम्हकर सर, पिंजारी सर यांचीही उपस्थित होती.
उपसरपंच प्रभु पा. कौटकर, चेरमन नारायण पा. कराले आणि शिक्षण समिती अध्यक्ष वसंत परडे , दशरथ पाटील कौटकर, मारोती पाटील परडे, संदीप पा. परडे, नामदेव पा. कौटकर ,नारायण वाघमारे आणि शालेच्या शिक्षीका भैलोंडे मैडम व आडकिणे मैडम यांचीही समायोचीत भाषने झाली.
विद्यार्थी म्हणुन उमेश परडे, योगेश्वरी वजीरगे, श्रावणी कराले, संस्कृति कराले, आहिलेश्वरी कराले,ऊज्वला कराले आणि ईश्वरी खणपटे यांनी सराविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गावकरी मंडलीच्या वतीने राजु सरांचा व संपूर्ण परीवाराचा आहेर व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सरांनी सत्काराला उत्तर देताना गावकरी यांनी दिलेल्या प्रेमाने भाराऊन गेल्याचे सांगुन आपले स्नेहबंध कायम राहतील असे सांगीतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोसले सर यांनी केले, सुत्रसंचलन पांचाल सर तर सर्वांचे आभार गोदाजी परडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी ईरबा वजिरगे, शिवाजी कराले, उत्तम परडे, रावसाहेब कराले, प्रभाकर परडे, वसंत परडे आणि बालाजी बोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास गावातील आजी माझी सर्व पदाधिकारि याच्यासह गावकरी मंडली, महिला , विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

