
श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने
येथील बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड शी संलग्नित असलेल्या श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीक्षेत्र माहूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शाश्वत विकासासाठी युवक – जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास या सात दिवसीय विशेष निवासी शिबीराचा उद्घाटन समारंभ आज दि. ०५ जानेवारी रोजी जग्गुनाईक तांडा येथे संपन्न झाला.
दररोज सकाळी ५ वाजेपासून या शिबीराची सुरूवात होणार असून, ६ते ०७ या वेळेत योगासन, ७ते ८ या वेळेत अल्पोपहार तर ८ ते १२ या वेळेत श्रमदान करण्यात येणार असून रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, प्रजनन आरोग्य, किशोरावस्था, ग्रामीण उद्योजकता, महिला आरोग्य, लोकसंख्या शिक्षण या सारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.
या शिबीराचे नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र.कुलगुरू डॉ. अशोक महाजन, विभागीय समन्वयक डॉ. अजय शिंदे, रासेयो चे राज्य संपर्क अधिकारी मिलिंद काळे, विद्यापीठाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड, जिल्हा समन्वयक डॉ. भागवत पस्तापुरे भेट देऊन स्वयंसेवकांच्या कार्याची पाहणी करणार आहेत.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ विलास पाटील हे होते तर गावचे सरपंच गणेश राठोड हे उद्घाटक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. राजेंद्र लोणे, उपसरपंच विनायक बेहेरे, ग्रा.पं.सदस्य संतोष नाईक, कृ. उ.बाजार समितीचे सदस्य बंडू जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव, ग्रामसेवक गादेकर, मुख्याध्यापक जगताप, पंचशील विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड, तुकाराम नाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो प्रमुख डॉ. अभिजित कांडलीकर यांनी सूत्रसंचालन प्रा. कृष्णा दुगाळे यांनी तर उपस्थितांचे आभार रासेयो सहायक डॉ. अवधूत लांडे यांनी व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड व सचिव सौ संध्याताई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी परिश्रम घेतांना दिसून आले.

