ताज्या बातम्यानांदेड

श्री.गुरू विठ्ठलना महाराज देवस्थान गोपाळ चावडी पदयात्रेस भाविक भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद…

नांदेड – श्री गुरू विठ्ठलनाथ महाराज देवस्थान गोपाळचावडी ते श्री क्षेत्र माहुरगड पदयात्रा 7 जानेवारी 26 रोजी भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थांनी रांगोळी काढून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर गावातील अनेक भाविक भक्त सहभागी झाले होते यावेळी विधीवत पूजन करून करण्यात येऊन गावातील मुख्य रस्त्याने ही पदयात्रा निघाली या पदयात्रेत महिला भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

श्री.गुरू विठ्ठलनाथ महाराज देवस्थान गोपाळ चावडी यांच्या वतीने गेल्या 10 वर्षांपासून ही पदयात्रा 7 जानेवारी रोजी निघत असते, यावेळी पहिल्या दिवशी गोपाळचावडी ते तुप्पा पाटी ते बारड 35 किलोमीटर अंतर तर दुसऱ्या दिवशी तामसा

मार्ग दतबरडी हादगाव, उमरखेड महागाव मार्ग ही पदयात्रा सहाव्या दिवशी माहुर येथे पदयात्रा माहुर गडावर पोहचुन महापुजा करून

हि पदयात्रा संपन्न होईल.

‌ 7 जानेवारी रोजी महा आरती नंतर गावातील प्रमुख रस्त्याने ही पदयात्रा निघाली प्रारंभी पदयात्रा शुभारंभ सरपंच प्रतिनिधी प्रदीप लाखे,

ऊपसरपंच साहेबराव सेलुकर,हनुमंत मैलगे,दलीत मित्र माधव अंबटवार, विश्वंभर शिंदे,रमेश तालीम कर,माधव दिवटे, व्यंकटराव धुमाळ,प्रकाश शिंदे, सदाशिव गुंडे,आशिर्वाद डाकारो यांच्या सह समाधान महाराज, सम्रात महाराज आगलावे,दशरथ दिवटे ,हनुमंत मेने,किशन धुमाळ,लक्ष्मण वाघमारे, चंद्रकांत बोयवारे व समस्त गावकरी मंडळी व सहभागी भाविक भक्त, भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!