
ईकळीमाळ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान विविध कार्यक्रम घेऊन अभियान सुरू..
कुंटूर : अनिल कांबळे
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या मौजे ईकळीमाळ तालुका नायगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध योजना कार्यक्रम स्वच्छता आरोग्य सेवा पाणी शुद्ध पाणीपुरवठा समृद्ध गाव योजना अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले.” यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येणार आहे.ग्रामपंचायत कार्यालय ईकळीमाळ ता . नायगाव खै.येथे आज दिनांक 7 /1 /2026 रोजी जिल्हा परिषद नांदेड येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अमित राठोड . व गटविकास अधिकारी वैष्णव . व विस्तार अधिकारी जाधव . यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत ईकळीमाळ येथे भेट दिली व सोबत पंचायत समिती ईंदुरकर सर व ग्रामपंचायत अधिकारी मुगटकर मॅडम व जि.प.नरेगा चे लोंढे सर उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध योजनेअंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करून पुढील कामाची सूचना देण्यात आली सदरील कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी विद्या मोरे मॅडम उपसरपंच चंद्रकलाबाई गिरी ग्रामपंचायत सदस्य माधवराव शिळे व गावातील नागरिक उपस्थित होते .
तसेच रोजगार सेवक अजिम शेख व ग्रामपंचायत कर्मचारी रामदास शिळे व पा.पु सेवक खाजामिया सय्यद व जि.प.शाळा मुख्याध्यापक रणविरकर उपस्थित होते . ग्रामपंचायत कार्यालय ईकळीमाळ येथे सरपंच सौ रेखा कैलास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत 17 सप्टेंबर ते 31 मार्च 2026 योजणे कार्यकाळात सहभाग घेतला असून विविध विकास कामे चालू आहेत. ग्रामपंचायत ईकळीमाळ येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. तसेच जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली .व गावातील सर्व वयोवृद्ध .बालके महिला यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी येथे शाळा रंग-रंगोटी करण्यात आले. तसेच शाळेत cc tv कॅमेरे बसवण्यात आले .तसेच शाळावर सौर पॅनल बसवण्यात आले आहे . गावात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच गावात 31/12/2025 50%माघिल थकबाकी वर सुट व चालु वर्षा तील पुर्ण घरपट्टी वसुली करण्यात आली.

