ताज्या बातम्यानांदेडनायगाव

ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर होताच अने कांना गांवचा कारभारी होण्याचे लागले डोहाळे !.

नरसीत ओबीसी प्रवर्गातील महिलेला प्रथमच संधी मांजरम ,कोलंबी, गडगा,कुष्णुर, कोकलेगाव बेटकबेळी सह काही गावात सर्वसाधारण याना संधी 80 पैकी बहुतांश जागा महिलाना आरक्षित महिला प्रवर्गात नवचैतन्य

नायगांव: बाळासाहेब पांडे
नायगांव तालुक्यातील एकूण ऐंशी ग्रामपंचायती असुन‌. येणाऱ्या काही कार्यकाळामध्ये ऐंशी गावाच्या कारभार्याचा कार्य. काळ संपुष्टात येत असून.पुढील ई. स.२०२५ ते २०३० या काला वधीसाठी बिलोलीतील उप विभागीय अधिकारी क्रांती डोंबे च्या उपस्तिती मध्ये तालूका दंड धिकारी सौ.धम्मप्रिया गायकवाड यांनी शुक्रवारी दुपारी ठिक तीनच्या तालुक्यातील सर्व कारभार्या चे जात निहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील एकुण तालुक्या पैकी सर्वात ज्यास्त भु क्षेत्रफळाने व गावांची संख्या आसलेल्या व ऐंशी ग्रामपंचायतीचा नायगांव तालुका असुन.या सर्व गांव कारभार्यांचा कालावधी जवळ जवळ संपुष्टात येत असुन. त्या अनुषंगाने. मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1964 चे नियम 2 (अ)(2) अन्वये ई. स. 2025- 2030 मध्ये होणा-या तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेवून दि.२५/०४/२०२५ रोज शुक्रवारी दुपारी तीन वाजता येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी तथा नियंत्रण अधिकारी क्रांती डोंबे व नायब तहसीलदार सतिश कुलकर्णी यांच्या उपस्थिती मध्ये तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी सौ. धम्मप्रिया गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्या तील ऐंशी ग्रामपंचायतीचे गांव
कारभार्यांचे जातनिहाय आरक्षण सोडती ची प्रक्रिया ही शांततेच्या वातावरणात पार पडली.
या वेळी अनुसूचित जाती पुरुषासाठी तलबीड , राजगड नगर ,कोठाळा, पिंपळ गाव,मुस्तपूर, गोदमगांव, सोमठाणा, खंडगांव, अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी मुगांव/मुगांवतांडा,कहाळा बु. ,वजांरवाडी,चारवाडी, टाकळी त.ब., धुप्पा ,मरवाळी तांडा, खैरगांव, निळे गव्हाण,अनुसुचित जमातीतील(पुरुष) मरवाळी, कोपरा, रातोळी, अनुसूचित जमाती महिलांसाठी, होटाळा, रुई खुर्द, तर ना.मा.प्र परडवाडी, कुंटुंर, टाकळी बु, ईकळीमाळ,केदार वडगांव, सावरखेड, इज्जतगांव बु, औराळा, मनुर त.ब, ना.मा.प्र. महिला सातेगांव ,धनंज, ईकळीमोर, शेळगांव छत्री, हिप्परगा जाने,पळसगांव ,टाकळगांव, सुजलेगांव, बरबडा, राहेर, नरसी,
खुला प्रवर्गासाठी टाकळी त.मा.धानोरा त मा.,घुंगराळा,कहाळा खुर्द, सालेगांव कु, कांडाळा,मोकासदरा,कोकलेगांव, कोलंबी, गडगा, पाटोदा त. ब.,मांजरम, कृष्णूर, कार्ला त.मा., माहेगाव, हंगरगा, लालवंडी,तकबीड,बेटकबिलोली, सांगवी, डोंगरगाव, खुला प्रवर्ग महिलांसाठी, हुस्सा,नरंगल,मांडणी नावंदी, वजीरगाव
, रानसुगांव, अंचोली, अंतरगाव, बेंद्री, टेंभुर्णी,कुंचेली,गोळेगाव, ,आलुवडगांव,नायगांव वाडी,शेळगांव गौरी, रुई बु,देगाव मेळगांव , भोपाळा,बळेगांव,दरेगाव ई.जाती निहाय नायगांव तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर झाले असुन. यावेळी अनेक पांढरपेशी पुढाऱ्यांनी गांवचा कारभारी होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होते.परंतु शुक्रवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमुळे अनेकांचा हिरमोड झाला.
तर भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून काल जाहीर झालेल्या याआरक्षण सोडतीमुळे समाजातील मागास प्रवर्गातील पुरुष व महिला प्रवर्गाला गावचा कारभारी होऊन गांवचा विकास करण्याची एक सुवर्णसंधी मिळाली आहे या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेवेळी मदतीला कार्यालयातील साईनाथ भंडारे, राजेश्वर आलमवाड, ,अशोक भालेराव, दिगांबर गिरी आदि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!