
नायगाव : बाबाळासाहेब पांडे
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेला वैतागून अखेर गावकऱ्यांनीच आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी लोकशाहीचा अधिकार बजावत गावकऱ्यांनी केलेल्या या कृतीची चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात जोरात सुरू आहे.
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत टेंभुर्णी येथे सार्वजनिक आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्चून उभारलेली आयुष्यमान आरोग्य मंदिराची नवी इमारत मात्र अनेक महिन्यांपासून वापराविना पडून होती. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने इमारत रुग्णांसाठी खुली करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात आरोग्य सेवा गावातील बौद्ध विहारात तात्पुरत्या स्वरूपात दिली जात होती. गावकऱ्यांनी संयम राखत वाट पाहिली; पण दिरंगाई कायमच राहिली.
दोन्ही उद्घाटनाची तारीख 26 चार महिन्यांपूर्वी २६ सप्टेंबर २०२५ रोजी मांजरम गावातील तरुणांनी पुढाकार घेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करून प्रशासनाला धक्का दिला होता. त्याच धर्तीवर टेंभुर्णीतही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला न जुमानता गावकऱ्यांनी सर्वानुमते २६ जानेवारी रोजी उद्घाटन करून आरोग्य सेवेचा मार्ग मोकळा केला.
लोकप्रतिनिधींची एकाधिकारशाही आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे रुग्णांची होत असलेली हेळसांड अखेर जनतेच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेली. “गावकरी ते राव नकरी” या म्हणीचा प्रत्यय देत, टेंभुर्णीकरांनी लोकशाही मार्गाने आपला आवाज बुलंद केला.
जनतेची उद्घाटने’—मांजरम सर्कलमध्ये नवा पॅटर्न ; मांजरम सर्कलमधील दुसरी घटना ; लाखो खर्चाची इमारत असूनही सेवा विलंबित.
प्रशासनाच्या दिरंगाईला प्रजासत्ताक दिनी प्रतीकात्मक उत्तरलोकप्रतिनिधी व प्रशासनाने धडा घेण्याची गरज—गावकऱ्यांची ठाम मागणी

