ताज्या बातम्यानांदेडनायगावशैक्षणिक

हिंदी विषयाच्या बारावी परीक्षेत २२२२ विद्यार्थी उपस्थित; ५३ अनुपस्थित.

नायगाव:

नायगाव तालुक्यात बारावीच्या हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी एकूण २२७५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २२२२ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, तर ५३ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

तालुक्यातील विविध केंद्रांवर शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा पार पडली. श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय शंकरनगर येथे २७७ पैकी ५ विद्यार्थी अनुपस्थित होते, तर जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगाव येथे ३६८ पैकी १२ विद्यार्थी गैरहजर राहिले. राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय नरसी येथे २५२ पैकी १० विद्यार्थी अनुपस्थित होते.

जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालय बरबडा येथे सर्वाधिक ४१३ विद्यार्थ्यांपैकी ४०७ उपस्थित होते, तर इतर केंद्रांवर अनुपस्थितीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. काही केंद्रांवर शंभर टक्के उपस्थितीची नोंदही करण्यात आली.

परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुविधा, कडेकोट बंदोबस्त व उडती पथके यांच्या देखरेखीखाली परीक्षा सुरळीत पार पडली. एकूणच हिंदी विषयाची परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराशिवाय शांततेत संपन्न झाल्याचे परीरक्षा प्रमुख रेंगुंटवार सर यांनी प्रशासना च्या वतीने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!