ताज्या बातम्यानांदेडनायगाव

योग्य वेळी मिळालेल्या सद बुद्धीने , व संत संगतीने जीवन धन्य होते – ह.भ.प. डॉ.सुदाम महाराज पानेगावकर.

नायगाव :

संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून योग्य वेळी मिळालेल्या सद बुद्धीनेआणि संतसंगतीने मानवी जीवन धन्य होते या मुळे म्हणून संधीचे महत्त्व खूप आहे यासाठी वेळेची संधी दवडू नये ती जीवनात महत्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. असे जीवन महत्वाचे आहे असे विचार ह.भ.प.विश्र्वशांती मंडळ अध्यक्ष आळंदी पुणे डॉ.सुदाम महाराज पानेगावकर यांनी “बरवी हे वेळ सापडली संधी” या अभंगा वर विवेचन करताना व्यक्त केले.

ते सिद्धेश्वर मंदिर कळसारोहन व महाशिवरात्री निमित्त आयोजित रुई येथील अखंड हरिनाम सप्ताह मध्ये आयोजित तिसऱ्या दिवसाची सेवा करताना व्यक्त केले.अभंगावर बोलताना ते पुढे म्हणाले जीवनातील परिवर्तनासाठी योग्य क्षण आणि संतांच्या कृपेची गरज स्पष्ट करण्यात आली आहे.या अभंगात तुकाराम महाराज सांगतात की, आयुष्यात एक वेळ अशी येते, जेव्हा माणसाला योग्य मार्गाची जाणीव होते. पूर्वसंचित पुण्यामुळे बुद्धीला योग्य दिशा मिळते आणि त्यातून परमार्थाच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा मिळते. संतांच्या चरणांचे दर्शन झाल्याने मनातील अज्ञान, पाप आणि दारिद्र्यरूपी दोषांचा नाश होतो.

या आध्यात्मिक परिवर्तनामुळे मन शुद्ध होते आणि जीवनाचा खरा अर्थ समजतो. संतसंग आणि नामस्मरणामुळे आयुष्य सार्थकी लागते. तुकाराम महाराज पुढे म्हणतात की, या कृपेने जीवनातील सर्व व्यर्थ धावपळ थांबते आणि जन्माचे खरे फळ मिळते.

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून समाजाला सद्विचार, संतसंग आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा महत्त्वपूर्ण संदेश मिळत असून, आध्यात्मिक मार्ग स्वीकारल्यास जीवन आनंदी व अर्थपूर्ण होऊ शकते, असे प्रतिपादन करताना त्यांनी स्वतःचे उदाहरण देत आपण संत संगतीत गेल्याने माझे चिरंजीव उत्कृष्ट यशस्वी होत बिलोली उपविभागाचे डी वाय एस पी पदावर विराजमान झाले आहेत.ते उत्कृष्ट कीर्तनकार, गायक,असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी पानेगावकर महाराज यांनी पाणी हे मानवी जीवनाचे महत्वाचे साधन असून नायगाव शहरातील पाणी हे क्षार युक्त असल्याने आरोग्यावर अनिष्ट परिणामाची चिंता व्यक्त करून पाणी व जीवन यांचे महत्व त्यांनी विषद करीत वेळीच सावध होण्याचा सल्ला त्यांनी दिला.यावेळी कीर्तनात कुंटूर पोलिस ठाण्याचे पीएसआय पवार,जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे,मनोज आरगुलुवार,कैलास कावटिकवार ,सेवानिवृत मुख्याध्यापक पाटोदेसर,बालाजी काळे,या सह परिसरातील भक्त गण उपस्थित होते.कार्यक्रमाचे शेवटी सिद्धेश्वर मंदिर आश्रम चे प्रमुख हरिओम बाबा यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!