
माहूर येथील आनंद दत्त धाम आश्रम उर्फ वसमतकर मठाचे मठाधिपती द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या प्रबोधनात्मक कार्याच्या व स्वच्छतेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्राचे स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती केल्याने मराठा सेवा संघाचे ज्ञानेश्वर चौधरी, सतीश ठाकरे यांनी आनंद दत्तधाम आश्रम येथे सत्कार करून कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. सन १९९५ पासून सह्याद्रीच्या कुशीत माहूर शहरालगत स्थापन झालेल्या आनंद दत्त धाम आश्रमतर्फे अध्यात्म, सत्संग सह जीवाचा उद्धार करण्याच्या उद्दात हेतूने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये कोरोना कालावधीत गरजू नागरिकांना केलेली अन्नधान्याची मदत, आश्रमात सदैव अखंडीतपणे सुरू असलेले अन्नदान महाप्रसाद, विद्यार्थांना मार्गदर्शन करण्याकरिता आयोजित शिक्षण परिषद व विविध यात्रा महोत्सवात यात्रा बंदोबस्त मध्ये कर्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था, ग्रामीण रुग्णालयातील भरती रुग्णांना व सोबतच्या नातेवाईकांना अखंडीत पणे भोजन डब्बे पुरवठा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या विचाराचा वसा घेऊन राज्यभरात व देशभर फिरत विविध ठीकांनी स्वच्छता अभियान सह प्रबोधन करून गावाची व लोकांच्या मनाची स्वच्छता केली. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांची महाराष्ट्राचे स्वच्छता दूत म्हणून निवड करून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते आ.डॉ.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्ती केली. या नियुक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून अनेक ठिकाणी सत्कार होत आहेत. सत्कार प्रसंगी अनिल सुरोशे, किसनराव भांगे, शेषराव पाटील, गजानन कलाने, सुरेश आराध्ये आदीसह मठाचे सदस्य व शिष्यमंडळ उपस्थित

