ताज्या बातम्यानांदेडनायगाव

ब्रेकडाऊनच्या नावाखाली कुंटूर 33 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित.

घुंगराळा 33 केव्ही उपकेंद्र चालू तिथूनच कुंटूर 33केव्ही उपकेंद्रला लाईट येते मात्र कुंटूर 33 उपकेंद्र बंद.

कुंटूर :

महावितरणकडून ब्रेकडाऊन व इमर्जन्सी लोडशेडिंगचे कारण देत कुंटूर 33 केव्ही उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे कुंटूरसह परिसरातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा बंद असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

महावितरणच्या अधिकृत संदेशानुसार, “इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू असून वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. मुख्य कार्यालयाकडून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत कोणतीही निश्चित वेळ देण्यात आलेली नसल्याने वेळ सांगता येणार नाही,” असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वारंवार होणाऱ्या ब्रेकडाऊन व अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. शेती, पाणीपुरवठा,पिठाची गिरणी; आणि फिल्टर पाणी आणि दैनंदिन कामांवर याचा विपरीत परिणाम होत असून, महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करून वारंवार होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!