
नायगाव :
नायगावच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविणारे पंचक्रोशीचे लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय बळवंतरावजी पाटील चव्हाण यांच्या १९ व्या पुण्यस्मरणानिमित्त जनता हायस्कूल परिसरातील स्मृतिस्थळ व हनुमान मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पुष्पांजली कार्यक्रमात भावपूर्ण वातावरणात त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला जनसमुदायासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. बळवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. संपूर्ण परिसरात श्रद्धा, आदर आणि स्मरणभावनेचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी स्व. अण्णांचे ज्येष्ठ नातू डॉ. अमरजीत पाटील, सौ. रूपालीताई चव्हाण, खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण व सोनियाताई चव्हाण, स्व. अण्णांच्या ज्येष्ठ कन्या लक्ष्मीबाई शिंदे मांजरमकर यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर पंकज पाटील, सायलीताई चव्हाण, श्रीकांत पाटील, श्वेताताई, अजित पाटील, शितलताई चव्हाण, सुमित पाटील, निकिताताई चव्हाण, विराज पाटील चव्हाण, ईशान पाटील चव्हाण व राजवंश पाटील चव्हाण यांच्या हस्ते विधिवत पूजनाचा सोहळा संपन्न झाला.यावेळी चव्हाण परिवारातील ज्येष्ठ केशवराव बळवंतराव पाटील चव्हाण, हनमंतराव बळवंतराव पाटील चव्हाण, सुधाकरराव बळवंतराव चव्हाण, आनंदराव शंकरराव पाटील चव्हाण, श्रीनिवास व्यंकटराव पाटील चव्हाण, धनंजय शंकरराव पाटील चव्हाण, श्रीधर व्यंकटराव पाटील चव्हाण, विजय शंकरराव पाटील चव्हाण, डॉ. विश्वास व्यंकटराव पाटील चव्हाण यांच्यासह समस्त चव्हाण परिवार उपस्थित होता.कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शिक्षणप्रेमी, पत्रकार तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिवस भरात माजी आ.हणमंत बेटमोग्रेकर यांच्या सह अनेक मान्यवर यांनी उपस्थिती लावली उपस्थितांनी स्व. बळवंतरावजी चव्हाण यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा, जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा आणि लोकहितासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.स्व. बळवंतरावजी पाटील चव्हाण यांच्या कार्याचा वारसा समाजहितासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा दीप आजही असंख्य कार्यकर्त्यांना दिशा देत असल्याची भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. श्रद्धा, सन्मान आणि कृतज्ञतेने भारावलेल्या वातावरणात हा पुष्पांजली कार्यक्रम संपन्न झाला.


