Uncategorized

मांजरमच्या अंगणवाड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करून नव्या इमारती द्यापांडुरंग शिंदेनायगाव.

मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून जीर्ण व धोकादायक इमारतींच्या ठिकाणी नवीन सुसज्ज अंगणवाडी इमारती मंजूर कराव्यात, तसेच सर्व अंगणवाड्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, खेळणी, फर्निचर आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी गट विकास अधिकारी श्री. वानखेडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे की, मांजरम येथील अनेक अंगणवाड्या जीर्ण अवस्थेत असून विशेषतः अंगणवाडी क्र. २ ची इमारत अत्यंत धोकादायक बनली आहे. परिणामी लहान बालकांना पर्यायी खोलीत शिक्षण घ्यावे लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय अनेक अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्य, खेळणी, फर्निचर, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी तसेच इतर आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने बालकांच्या सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे प्रत्यक्ष पाहणीसह सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी नवीन इमारतींची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी तातडीने नवीन सुसज्ज अंगणवाडी इमारती मंजूर करण्यात याव्यात. तसेच सर्व अंगणवाड्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, खेळणी, फर्निचर, स्वयंपाक साहित्य व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, व्यंकट अण्णा शिंदे, विष्णुभर शिंदे, मधुकर शिंदे, गंगाधर शिंदे, गणेश वाघमारे, रोहिदास नव्हारे आणि काशिनाथ बाळापुरे उपस्थित होते “नायगाव तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची थकीत बिले तात्काळ अदा करण्यात यावीत, अशी स्वतंत्र मागणीही गट विकास अधिकारी श्री. वानखेडे यांच्याकडे करण्यात आली आहे. पांडुरंग शिंदे मांजरमकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), नायगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button