Uncategorized

सौर ऊर्जेच्या धर्तीवर पवन ऊर्जेलाही अनुदान द्या माजी नगरसेवक पत्रकार इलियास बावाणी यांची तहसीलदारामार्फत शासनाकडे मागणी.

माहुर

श्रीक्षेत्र माहूर केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर वीज अनुदान योजने अंतर्गत सौरऊर्जा प्लांट लावण्यासाठी 30 हजार ते 78 हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान आणि महिन्याला 200 पेक्षा जास्त युनिट मोफत वीज दिली जात आहे. या योजनेमुळे देशात आतापर्यंत लाखो नागरिकांनी शेतकऱ्यांनी घरांवर शेतात सौर ऊर्जा सोलर लावले आहेत. याच धर्तीवर आता घराघरावर छोट्या पवनऊर्जा स्मॉल विंड टरबाइन प्लांटसाठी सुद्धा सबसिडी मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार मार्फत शासनाकडे माजी नगरसेवक तथा पत्रकार इलियास बावाणी यांनी केली आहेनांदेड जिल्ह्यातील माहूर शहर उंचावर वसले असून तालुक्यातील गावेही बऱ्याच उंच भागावर वसलेली आहेत त्यामुळे उन्हाळ्यात सौरऊर्जा चांगली मिळते मात्र पावसाळा आणि रात्रीच्या वेळी सोलर बंद पडते. मात्र या काळात वारा मुबलक असतो. शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांच्या समस्या लक्षात घेता जर 1 ते 3 किलोवॅटचा छोटा पवन प्लांट घराच्या छतावर किंवा शेतात लावला तर दिवसरात्र वीज निर्मिती होईल विज साठवणूक करण्यासाठी चार्जिंग च्या बॅटऱ्याची गरज राहणार नसल्याने खर्चात प्रचंड बचत होईल आर्थिक मानसिक त्रास वाचेल त्यामुळे दुष्काळी योजनात नागरिकांच्या फायद्यासाठी ही योजना राबवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहेसोलरला सरकारने 78 हजार पर्यंत सबसिडी दिली कर्ज दिले तसेच 500 वॅट ते 2 किलोवॅटच्या घरगुती पवन ऊर्जेसाठी 60 ते 78 हजारापर्यंत अनुदान दिले पवन ऊर्जेसाठी सबसिडी दिल्यास प्रत्येक शेतकरी स्वतःची वीज स्वत तयार करेल एमएसईबीचे बिल शून्य होईल तसेच जागा पण कमी लागेल असे माहूर येथील माजी नगरसेवक पत्रकार इलियास बावाणी यांनी मागणीत नमूद केले आहेपवन ऊर्जा तज्ज्ञांच्या मते पवन ऊर्जेसह सौर + पवन = हायब्रीड सिस्टीम ही काळाची गरज आहे. केंद्राच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने एम एन आर इ योजनेअंतर्गत जर छोट्या पवन प्रकल्पांसाठी सुद्धा पी एम सूर्यघर योजना सारखे पोर्टल डीबीटी द्वारे अनुदान आणि नेट मीटरिंग सुरु केले तर ग्रामीण भाग खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल.शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पवन ऊर्जा घरगुती सबसिडी योजना जाहीर करावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा पत्रकार इलियास बावाणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री अतुलजी सावे ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे निवेदनाद्वारे यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button