
जयकुमार अडकिने श्रीक्षेत्र माहूरगड परिसरातील राष्ट्रीय महामार्गाची अनेक महत्त्वाची कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली असून ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी माहूरकरांच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या मागणीसाठी पत्रकार अपील बेलखोडे व राज ठाकूर यांनी दि. २८ सप्टेंबर २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र उपोषणाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याने दि 1रोजी माहुरकर सर्व पत्रकाराकडून माहूर बंदची हाक देण्यात आली आहे रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देऊन ती तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे प्रशासनाने मागण्यांची दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा यासाठी माहूर शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता दत्त चौक टी-पॉईंट माहूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनासंदर्भात माहूर पोलिस ठाण्याला लेखी निवेदन देण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रखडलेल्या विकासकामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधावे असे आवाहन करण्यात आले आहे.रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून माहूरच्या विकासाला गती द्यावी हीच माहूरकरांची प्रमुख मागणी असून गेल्या अनेक वर्षापासून कामे रखडल्याने नागरिकांतून तसेच येणाऱ्या भाविकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे


