ताज्या बातम्यानांदेडनायगाव

शेतकऱ्याच्या लेकींची क्रीडा भरारी; वेटलिफ्टिंगमध्ये बहिणींचे घवघवीत.

शेतकऱ्याच्या लेकींची क्रीडा भरारी; वेटलिफ्टिंगमध्ये बहिणींचे घवघवीत यश साक्षी जुन्ने प्रथम; शिवानी जुन्ने तृतीय क्रमांकावर, साक्षीची विभागीय स्पर्धेसाठी निवड नायगाव ग्रामीण भागातील प्रगतिशील शेतकरी किशनराव जुन्ने यांच्या सख्ख्या कन्यांनी वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करत आपल्या कुटुंबासह शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. मिलेनियम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नायगाव येथील कु. साक्षी जुन्ने हिने वेटलिफ्टिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तिची सख्खी बहीण कु. शिवानी जुन्ने हिने तृतीय क्रमांक मिळवला.कोकलेगाव येथील शेतकरी किशनराव जुन्ने यांच्या दोन्ही मुलींनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती साधली आहे. शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येऊनही दोन्ही बहिणींनी नियमित सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर वेटलिफ्टिंगमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशामुळे कोकलेगाव परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.वेटलिफ्टिंगसारख्या मेहनत, ताकद, सातत्य आणि नियमित सरावाची आवश्यकता असलेल्या क्रीडा प्रकारात दोन्ही बहिणींनी मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. साक्षीने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेची पात्रता मिळवली असून, आगामी स्पर्धेत तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. तर शिवानीने तृतीय क्रमांक मिळवत आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवून दिली.या दोन्ही खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शन करणारे शिक्षक वाकरडे , सौ. माधुरी मॅडम आणि नामवाडे यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळत असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.या यशाबद्दल श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, प्राचार्य तथा प्रशासकीय प्रमुख फाजगे , प्राचार्य वडजे तसेच संस्थेतील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी साक्षी व शिवानी जुन्ने या सख्ख्या बहिणींचे अभिनंदन केले. तसेच साक्षीला आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button