
श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने माहुर:महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्वच कामांमध्ये जिल्ह्यात आघाडीवर असलेले उत्कृष्ट तहसीलदार अभिजीत जगताप यांचा महसूल प्रशासनाच्या वतीने नांदेड येथे दि 6 रोजी शंकरराव चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या हस्ते गौरव होणार असल्याचे पत्र व्हायरल झाल्याने समाजातील सर्व स्तरातून तहसीलदार अभिजीत जगताप यांचे अभिनंदन होत आहे माहूर तालुक्याचे तहसीलदार साहेब यांची उत्कृष्ट तहसीलदार म्हणून झालेली निवड ही संपूर्ण माहूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर त्यांनी हा मानाचा सन्मान प्राप्त केला आहे.त्यांच्या नेतृत्वामुळे महसूल प्रशासन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि जनतेसाठी सुलभ झाले. हा सन्मान त्यांच्या अथक परिश्रमांची आणि सेवाभावी वृत्तीची योग्य दखल आहे.महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या कार्याचा उत्कृष्ट तहसीलदार म्हणून गौरव केला जात असल्याने समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे


